वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत.
ज्यामध्ये सर्वात आधी धैर्य आणि शौर्याचा दाता समजला जाणारा मंगळ १ जुलै रोजी सिंह राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर ७ जुलै रोजी धनाचा दाता शुक्र सिंह राशीत प्रवेश तर ८ जुलै रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम ३ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. तर त्या शुभ राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी हा ग्रहांचा राशी बदल अनुकूल ठरू शकतात. त्यामुळे या काळात नोकरदारांना करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या शुभ परिणामांमुळे तुमचे शौर्य आणि साहस वाढू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच तुमच्या मनातील इच्छादेखील पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. विवाहितांच्या आयुष्यात एक नवा उत्साह दिसू शकतो.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी ३ ग्रहांचा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुलैचा पहिला आठवडा खूप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे, प्रगतीच्या चांगल्या संधी आहेत आणि आर्थिक लाभही होऊ शकतो. या काळात तुम्ही कुटुंबीय किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करू शकता. यासोबतच कुटुंबात एखादा धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. या काळात तुमचे अडकलेले पैसे परच मिळण्याची शक्यता आहे.
तूळ रास
३ ग्रहांचा राशी बदल तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. हा कालावधी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल ठरु शकतो. दुसरीकडे करिअरच्या दृष्टीने हा काळ चांगल्या संधी घेऊन येण्याची शक्यता आहे. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. पती-पत्नीच्या जीवनात गोडवा राहू शकतो. या काळात तुम्ही नवीन जमीन किंवा फ्लॅट खरेदी करू शकता. जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांचा या काळात खूप नफा होऊ शकतो.