मित्रांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल, स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही स्वामींची सेवा नक्की करत असाल. सेवा करताना तुम्ही तारक मंत्र म्हणत असालच. आणि तारक मंत्र म्हणत नसाल तर तो तुम्ही आजपासूनच दररोज म्हणायला सुरुवात करा, कारण तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती असते. तारक मंत्र हा आपल्या स्वामींचा मंत्र जो कि आपल्याला सर्व संकटातून तारून नेहणारा आपल्या प्रेत्येक संकटातून वाचून नेणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे बोल आहेत.तुम्ही तारक मंत्र हा अवश्य घरात बोलायला हवा, आज आपण आजच्या लेखात ह्या तारक मंत्रासोबत करावयाचा सोपा एक उपाय जाणून घेणार आहोत.
मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये दररोज तारक मंत्र म्हटल्यानंतर केला तर यामुळे आपल्यावर स्वामींची कृपाआशीर्वाद आपल्यावर राहतो आणि स्वामी आपले रक्षण करतात. चला जाणून घेउयात तो उपाय कोणता ते. जेव्हा तुम्ही बसून तारक मंत्र बोलता तेव्हा आपण आपल्या समोर आपण तांब्याचा ग्लास किंवा वाटी आपण भरून ठेवायची आहे. त्यानंतर आपण देवासमोर बसून आपण ११ वेळा किमान हा तारक मंत्र आपण म्हणायचा आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्तवेळा सुद्धा ह्या मंत्राचा जप आपण करू शकता. पण तो जप आपण मनापासून करायचा आहे.
हा जप झाल्यानंतर आपण ते पाणी जे ठेवले होते ते आपण प्याचे आहे तसेच ते पाणी आपण घरातील सदस्यांना देखील द्याचे आहे. तसेच उरलेले पाणी आपल्या घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडायचे आहे, जेणेकरून आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील ते सर्व वास्तुदोष दूर होतील. सर्व घरातील समस्या आजारपण दूर होते. आणि घरातील व्यक्तींचे आरोग्य देखील चांगले राहते. मित्रांनो स्वामी आपल्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतात, स्वामींच्या कृपेचा अनुभव हा स्वामीभक्ताला येतोच येतो. म्हणून तुम्हाला देखील स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्याचा असेल तर घरात तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा.
मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही प्रकराची समस्यांनी त्रासलेले असाल, आर्थिक समस्यांनी ग्रस्त असाल ह्या सर्व समस्या स्वामींवर सोडून द्या व स्वामीसेवा करा स्वामी सर्व काही नीट करतील. सर्व संकटातून बाहेर काढतील आणि त्याच बरोबर असाह्य दुर्बल झालेल्या समाजाला स्वामींनी भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला आहे. आज हा दिलासाच कित्येक स्वामीभक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रेत्येक्ष रूपात नसले तरी स्वामीकृपेने त्यांचे सानिध्य त्यांना भाविकांना पदोपदी जाणवते. स्वामींनी अनेक भक्तांना ताठ मानेने जगायला शिकवले आहे. स्वामींचा तारक मंत्र हा प्रेत्येक ताणतणाव ग्रासलेल्या व्यक्तीला तणाव नियंत्रणाचे धडे देतो.
तारक मंत्र मधील शब्द हे दिलासादायक आहेत, सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना आपण तारक मंत्र म्हणण्याचा व समजून घेण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आयुष्यातील ताणतणव कायमचा निघून जाईल, व जीवन सुखमय बनेल. तर मित्रांनो तुम्हीही स्वामी समर्थांची अगदी मनापासून पूजा अर्चा आणि त्याचबरोबर स्वामींची सेवा पारायण मंत्र जप करत असाल आणि जर तुम्ही त्यासोबतच हा एक उपाय दररोज करायला सुरुवात केली तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये काही दिवसांमध्ये सकारात्मक परिणाम झालेला तुम्हाला दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.