गुरुचरित्र पारायण करताना खूपच अडचणी येतात, तर मग करा हा उपाय!

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे सेवेकरी भक्त आहेत. अगदी मनोभावाने बरेच जण हे स्वामींची सेवा देखील करत असतात. म्हणजेच अनेक केंद्रामध्ये मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा करण्यात लीन होऊन जातात. तर काहीजण हे आपल्या घरामध्येच स्वामींची मूर्ती आणून किंवा फोटो आणून स्वामींची घरात नित्यनेमाने पूजा विधी सेवा हे करीतच असतात.

तसेच गोड पदार्थांचा नैवेद्य देखील स्वामींना दाखवत असतात. जेणेकरून आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर व्हाव्यात संकटे दूर व्हावेत. तर मित्रांनो जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल आणि त्या पारायणामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येत असतील तर या अडचणींवर एक चमत्कारिक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे.

हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमच्या गुरुचरित्र पारायण यामध्ये अजिबात काहीही अडचणी येणार नाहीत. बरेच जण आपल्यापैकी असे असतात की जे म्हणतात की माझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे मला पारायण स्वामींची सेवा करण्याची काहीच गरज नाही. तसेच अनेक प्रकारचे वास्तुदोष आपल्या घरामध्ये असल्यामुळे देखील आपले पारायण करीत असताना अनेक अडचणी निर्माण होतात.

तसेच अनेकांचे पारायण करण्याकडे मन लागत नाही किंवा जरी पारायण करत असताना अनेक विविध अडचणी येत असतात त्यामुळेच वास्तुदोष असल्यामुळे आपल्या गुरुचरित्र पारायण करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तसेच अनेक जण अध्यात्म याकडे दुर्लक्ष करीत राहतात. तर मित्रांनो घरामध्ये वास्तुदोष किंवा नजर दोष किंवा अनेक विविध कारणामुळे आपल्या पारायण करण्यामध्ये काही ना काही अडचणी येतात आणि आपले पारायण ते पूर्ण होत नाही.

तर तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करणार असाल तर त्याच्या आधी तुम्हाला म्हणजेच गुरुचरित्र पारायण करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक नारळ खरेदी करून आणायचा आहे आणि तो आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे आणि तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची आहे की, हे स्वामी महाराज मी तुमचे गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात करणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अजिबात येऊ देऊ नका. माझे हे पारायण पूर्ण होऊ द्या मी अगदी मनाने हे पारायण करीन असे म्हणून तुम्ही स्वामींना प्रार्थना करून आरती करायची आहे.

जो नारळ आहे हा तसाच स्वामींच्या मूर्ती समोर तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही पारायनाला सुरुवात करायची आहे आणि सात दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच तुमचे गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी संपेल त्या दिवशी तुम्ही तो नारळ उचलून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे.

मित्रांनो असा हा उपाय तुम्ही जर केला तर यामुळे तुमचे गुरुचरित्र पारायण यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुमचे गुरुचरित्र पारायण व्यवस्थित पार पडेल आणि स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील.

Leave a Comment