शनिवारची विशेष स्वामीसेवा; दुःख अडचणी होतील दूर इच्छा होणार पूर्ण!

आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर व्हाव्यात, दुःख दूर व्हावेत, कोणत्याही प्रकारची संकटे आपणाला जीवनामध्ये नको असतील तर आज मी तुम्हाला एक स्वामींचा विशेष असा चमत्कारिक मंत्र सांगणार आहे. या मंत्राचा जप जर तुम्ही 108 वेळा म्हणजेच एक माळ जरी केला तरी यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी स्वामी महाराज दूर करतील. ही शनिवारची विशेष अशी सेवा आहे. यामुळे तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील म्हणजेच खूप दिवसांपासून मनी बाळगलेल्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत.

तसे तर आपण स्वामींची सेवा करीतच असतो. काही जण हे मठांमध्ये जाऊन स्वामींच्या सेवेमध्ये लीन होऊन जातात. तर बरेच जण हे वेळेअभावी घरामध्ये स्वामींचे अनेक मंत्रांचा जप देखील करीत असतात. तसेच स्वामी महाराजांचे व्रत उपवास करीत असतात. तर हा जो मंत्र आहे हा मंत्र खूपच चमत्कारिक, प्रभावशाली असा मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही एक माळ करायचा आहे.

घरातील स्त्री असो, पुरुष असो कोणतीही व्यक्ती ही स्वामींची शनिवारची विशेष सेवा करू शकतात. तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कोणत्याही वेळेस या मंत्राचा जप करू शकता. तो प्रभावशाली मंत्र नेमका कोणता आहे चला तर जाणून घेऊयात. तर तो मंत्र काहीसा आहे

ओम स्वनंदकंदस्वामिने नमः
या मंत्राचा जप 108 वेळा करून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी मनोभावे, श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. कोणत्याही प्रकारचे विचार आपल्या डोक्यामध्ये आणायचे नाहीत. यामुळे आपल्या सर्व जीवनातील अडीअडचणी, दुःख स्वामी महाराज दूर करतील. त्यांची कृपा आपल्यावर राहील आणि आपल्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर अशी ही शनिवारची विशेष स्वामी सेवा तुम्ही देखील अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment