मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक सण उत्सव अगदी आनंदाने साजरे केली जातात. प्रत्येक सण उत्सवाला अगदी विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्याप्रमाणे संकष्टी चतुर्थी तसेच एकादशी, पौर्णिमा, अमावस्या यांना देखील विशेष महत्त्व आहे. तर सर्व एकादशीमध्ये आषाढी एकादशी ही खूपच मोठी मानली जाते आणि या एकादशीला खूपच महत्त्व देखील आहे.
तर यावर्षी गुरुवारी 29 जूनला आषाढी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे आणि या दिवशी तुम्हाला ही एक वस्तू घरी खरेदी करून आणायची आहे. ही वस्तू जर तुम्ही खरेदी करून आणला तर आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल .पैशाची बरकत राहील. कधीच पैशाबाबतीत टंचाई निर्माण होणार नाही. माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल.
तर तुम्ही देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी कधीही वस्तू खरेदी करून आणू शकता आणि घरी आणल्यानंतर कायमस्वरूपी आपल्याला ही आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे. तर ती वस्तू म्हणजेच पांढऱ्या रंगाची कवडी. तर तुम्ही पांढऱ्या रंगाची कवडी खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायचे आहे व तुम्ही कितीही आणल्या तरी पांढऱ्या रंगाची कवडी खरेदी करून आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे आणि आपल्या देवघरांमध्ये स्थापित करायचे आहे.
हळदीकुंकू, अक्षत, फुले वाहून विधिवत पूजा करायची आहे. आरती करायची आहे आणि नंतर आपल्याला ही कवडी आपल्या कपाटात किंवा दुकानाच्या गल्ल्यांमध्ये ठेवायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची बरकत राहील. पैसा कमी पडणार नाही. माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये राहील. तर अशी ही वस्तू तुम्ही देखील देवशयनी आषाढी एकादशी दिवशी आवश्य खरेदी करून आणा.