स्वामींनी सांगितलेला ‘हा’ उपाय करा; समस्यांचा डोंगर होईल नाहीसा!

मित्रांनो, आपल्याला दैनंदिन आयुष्यात आणि एकूणच जीवनात अनेक अडचणी येत असतात, दु:ख, भिती, चिंता,काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटुन असल्या सारखे वाटते, काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन देखील होत नाही.

अशावेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात असा अनेकांचा अनुभव आहे. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरीता खालील उपाय करून पहा.

दररोज घरात श्री सूक्त पठन केले असता, त्या घरात धन-धान्याची कमतरता जाणवत नाही. लाल रंगाच्या कापडामधे तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेश द्वारावर बांधल्यास घरात सुखशांति व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तूळशीला दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो.

आपल्याला आलेल्या नोकरी, व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरूचरीत्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा.

कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याचवेळा त्रासदायक यातना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तीसरा व श्री गुरूचरीत्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा असे सांगितले जाते.

ज्या घरामध्ये एक तरी भक्तीवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटूंबीय केवळ त्याच्यामुळे तरून जातात आणि ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटूंबाला सतत संकटांना सामोरे जावे लागते, शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमीत बोला, किंवा रेकॉर्डींग सुरू ठेवा.

स्वयंपाक करत असतांना किंवा इतर महत्वाच्या कामांच्यावेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो. उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा करणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान-चिंतनाची आवश्यकता फार असते, म्हणून ध्यानधारणा मननचिंतन याला आयुष्यात फारच महत्त्व आहे.

बहुतेक लोकांना अनेकवेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12 व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्या. शांत झोप लागेल.

कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं अशी शिकवण स्वामींनी दिली आहे म्हणून वरील माहिती व्हायरल करण्यास विसरू नका. एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला याची जास्त गरज असेल. स्वामींच्या खऱ्या सेवेकऱ्यास हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही ते नक्कीच एवढे समजदार आहेत.

Leave a Comment