मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती पाहायला मिळते. तसेच आपले हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव अगदी उत्साहाने, आनंदाने साजरी केली जातात. तर प्रत्येक दिवसाचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच संकष्टी चतुर्थी, एकादशी असेल या प्रत्येकाचे एक वेगळे महत्त्व आपल्याला पाहायला मिळते. आपल्यापैकी बरेच जण हे अनेक प्रकारचे विविध उपवास हे करीत असतात.
जेणेकरून देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्यावर व्हावा तसेच जीवनातून सर्व अडचणी, संकटे दूर होतील. तर 29 जून गुरुवारच्या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आहे आणि ही आषाढी एकादशी येण्याआधी आपल्याला काही महत्त्वाची कामे करून घ्यायची आहेत. कारण ही कामे केली नाहीत तर त्यामुळे त्या कामांमध्ये अपयश प्राप्त होते.
म्हणजे जर तुम्ही ही कामे देवशयनी आषाढी एकादशीनंतर केला तर यामुळे त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. तर ही महत्त्वाची कामे नेमकी कोणती आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो देवशयनी आषाढी एकादशीला देव हे झोपण्यास जातात. म्हणजेच चार महिने हे शयन कक्षेमध्ये असतात आणि त्यानंतर ते कार्तिकी एकादशीला पुन्हा जागे होतात आणि या चार महिन्यात तुम्ही अजिबात महत्त्वाची कामे करायची नाहीत. कारण देव हे झोपी गेलेले असतात आणि कार्तिकी एकादशी ते पुन्हा जागे होतात.
जर तुम्ही देवशयनी आषाढी एकादशी येण्याआधी जर तुम्ही हे महत्त्वाचे कामे केला तर यामुळे तुम्हाला त्यात यश मिळेल आणि जर तुम्ही देवशयनी आषाढी एकादशी नंतर कामे करण्यास सुरुवात कराल तर त्यामध्ये अपयश प्राप्त होते. तर तुम्ही ही कामे आषाढी एकादशी नंतर करायची नाहीत. तर चार महिने तरी ही कामे तुम्हाला करायची नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात ही कामे नेमकी कोणती आहे.
तर एखाद्याच लग्न जमले असेल किंवा साखरपुडा करावयाचा असेल तर तुम्ही ते आषाढी एकादशीच्या अगोदर करायचा आहे. तसेच जावळ, मुंज असेल, सत्यनारायण पूजा असेल, नवीन कामाची सुरुवात असेल तसेच वास्तुशांती असेल तर हे सर्व कामे तुम्ही देवशयनी आषाढी एकादशीच्या अगोदर करायचे आहेत आणि नंतर तुम्ही आषाढी एकादशीनंतर यापैकी कोणतेच काम करायचे नाही.
जर तुम्हाला देवशयनी आषाढी एकादशी अगोदर ही कामे करणे जमले नसेल तर तुम्ही चार महिने झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. म्हणजेच कोणतेही विघ्न कामांमध्ये येणार नाही. तर मित्रांनो तुम्ही देखील जर तुमची काही शुभ कामे करायची असेल तर तुम्ही ते 29 जून गुरुवारच्या आधी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशीच्या आधी करायची आहेत. जेणेकरून ही कामे तुमची व्यवस्थित पूर्ण होतील आणि त्यामध्ये तुम्हाला यश देखील प्राप्त होईल.