Friday, September 29, 2023
Homeअध्यात्मप्रेमात पडण्यापू्र्वी चाणक्य नीतीतील या गोष्टी लक्षात ठेवा, पदरी कधीच निराशा पडणार...

प्रेमात पडण्यापू्र्वी चाणक्य नीतीतील या गोष्टी लक्षात ठेवा, पदरी कधीच निराशा पडणार नाही

चाणक्य नीतीत लिहिलेल्या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. आर्थिक, नातेसंबंध आणि वागणूक अशा प्रत्येक गोष्टींचं विश्लेषण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इतक्या वर्षातही नीतीशास्त्र आणि दैनंदिन जीवनात काहीच बदल झालेला नाही. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात प्रेम आणि जोडीदाराच्या निवडीबाबतही म्हणणं मांडलं आहे.

आचार्य चाणक्य यांनी काही प्रेम करताना अमुकतमूक व्यक्तीची निवड करा असं सांगितलेलं नाही. पण विश्वासघात होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं आहे. व्यक्तिगत संबंधांशिवाय व्यवहारिक ज्ञान आणि यश यावर जोर दिला आहे.

दगाफटका करणारे किंवा त्रासदायक लोकांपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. तसेच गुणी आणि बुद्धिमान व्यक्तीसोबत नातेसंबंध जोडण्यावर जोर दिला आहे.कायम स्वत:चा विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे. त्यांना प्रेम भावनेशी काही देणं घेणं नसतं. अशी लोकं नातं टिकवण्यासाठी वेळ देत नाहीत. तसेच अशी नाती लवकर तुटतात.

प्रेम आणि नातेसंबंध जीवनातील कठोर पैलू आहे. त्यामुळे याकडे एखाद्या साच्यातून पाहणं योग्य ठरणार नाही. पण आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या पैलूंमुळे निवड करणं सोपं होऊ शकतं.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन