काही तासांनी ‘या’ राशींना मिळणार गडगंज पैसा!

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा दाता आणि न्याय देणारा मानलं जातं. म्हणजे शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. अशातच १७ तारखेला संध्याकाळी शनिदेव वक्री होणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.पण ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. त्या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

मकर राशी
शनीचं वक्री होणं मकर राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून धनाच्या स्थानी वक्री होणार आहे.यासोबतच तो तुमच्या राशीत लग्न स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच या काळात तुम्ही खर्चात बचत करु शकता.तर जे लोक जे मीडिया,कला,मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्राशी निगडित आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला ठरु शकतो.

सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी शनिचे वक्री होणे लाभदायक ठरू शकते.कारण शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या सप्तम स्थानी वक्री होणार आहेत. तर शश राजयोगही बनवत आहेत. त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवनात आनंदी राहू शकते. तसेच तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. रखडलेली कामे लवकर पूर्ण होण्याचीही दाट शक्यता आहे.

मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची वक्री चाल लाभदायक ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या नवव्या स्थानी वक्री होणार आहेत.त्यामुळे या काळात तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते.तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.या काळात तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. दुसरीकडे, कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. शिवाय तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

Leave a Comment