29 जून गुरुवार देवशयनी आषाढी एकादशी येईपर्यंत करा ही प्रभावी सेवा!

मित्रांनो 29 जून म्हणजे गुरुवारी देवशयनी आषाढी एकादशी आहे आणि या दिवशी बरेच जण हे व्रत, उपवास करीत असतात. अनेक नवीन कामांची सुरुवात देखील या दिवशी बरेच जण करतात. हा दिवस खूपच शुभ मानला जातो आणि आषाढी एकादशी ही सर्व एकादशी मध्ये खूपच मोठी मानली गेलेली आहे. याला खूपच महत्त्व दिले गेलेले आहे. तर आज मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही आषाढी एकादशी येईपर्यंत करायचे आहे.

म्हणजेच तुम्ही मग उद्या चालू करू शकता परवा चालू करू शकता. परंतु असे देवशयनी आषाढी एकादशी येईपर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे. ही जर सेवा तुम्ही केली तर यामुळे तुमच्या जीवनातील जे काही दुःख असतील, अडचणी असतील, संकटे असतील किंवा तुमच्या मनामध्ये इच्छा अपूर्ण राहिलेली असेल ती इच्छा देखील नक्कीच पूर्ण होईल. ही खूपच प्रभावी अशी सेवा आहे.

या सेवेमध्ये आपल्याला तीन गोष्टी करायचे आहेत. अगदी मनोभावे आणि श्रद्धेने जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला सर्व अडचणीतून मुक्तता मिळेल. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला आषाढी एकादशी येईपर्यंत तुम्ही जर एखादी कोणती सेवा करत असाल तर त्या सेवेबरोबर तुम्ही ही सेवा करू शकता किंवा ती सेवा पूर्ण करून नंतर ही सेवा तुम्ही चालू करू शकता.

या सेवेमध्ये तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली एक वेळेस वाचायचे आहे. मग ती तुम्ही सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा. परंतु विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला एक वेळेस वाचायचे आहे आणि ही नामावली वाचून झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळी जप करायचा आहे.

तर विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला स्वामींच्या केंद्रामधून, मठामधून किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील मिळेल. तर त्याचे पुस्तक तुम्ही आणू शकता आणि तुम्ही ते वाचू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या तीन गोष्टी या प्रभावी सेवेमध्ये करायचे आहेत. तर तुम्ही कधीही सेवा चालू करू शकता. परंतु 29 जून देवशयनी आषाढी एकादशी येईपर्यंत दररोज नित्यनियमाने न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे.

या सेवेमुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख नक्कीच कमी होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. तर तुम्ही देखील ही प्रभावी सेवा आवश्य करा. याचा शंभर टक्के लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.

Leave a Comment