घरात स्वामींची मूर्तीची स्थापना कधी व कशी करावी?

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे सेवेकरी आहेत. आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रत्येक जण स्वामींची सेवा करण्यामध्ये मग्न राहतात आणि केंद्रांमध्ये जाऊन स्वामींची सेवा ते करीत असतात. प्रत्येक अडचणीवर स्वामींची वेगळ्या प्रकारची सेवा सांगितली गेलेली आहे. तसेच स्वामींच्या मंत्रांचा जप देखील बरेच जण हे करत असतात.

परंतु अनेक जणांना कामामुळे वेळ पुरत नसल्यामुळे केंद्रांमध्ये जाणे शक्य नसते. त्यामुळे ते घरच्या घरी स्वामींची सेवा करीत असतात. तर आज मी तुम्हाला स्वामींची मूर्ती कधी आपल्या घरामध्ये आणायची किंवा त्यांची स्थापना कधी आणि कशी करायची याविषयी सविस्तर सांगणार आहे. तर तुम्ही देखील स्वामींची मूर्ती घरी आणणार असाल तर तुम्ही कोणत्याही शुभ वारी स्वामींची मूर्ती आणायची आहे.

मित्रांनो तुम्ही मूर्ती खरेदी केल्यानंतर त्याची स्थापना ही शुभ मुहूर्ताला करायचे आहे. म्हणजेच एकादशी, प्रदोष व्रत, गुरुपौर्णिमा, चतुर्थी व्रत किंवा स्वामींचा वार म्हणजेच गुरुवारी देखील स्वामींची मूर्तीची स्थापना करू शकता. स्वामींच्या मूर्तीची स्थापना करण्याअगोदर आणलेल्या मूर्तीची भडजींकडून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे.

जर तुम्हाला भडजींकडून ब्राह्मणांकडून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घेणे जमत नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता. म्हणजेच एका तांम्हणा मध्ये तुम्ही आपल्या स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आणि अकरा चम्मच त्यावर दूध घालायचे आहे आणि नंतर 11 चम्मच पाणी घालायचे आहे. पाणी व दूध घालत असताना तुम्ही प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ म्हणायचे आहे.

नंतर ती मूर्ती व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि ती आपल्या देवघरांमध्ये स्थापित करायचे आहे. नंतर दिवा अगरबत्ती करून स्वामींच्या मंत्र्यांचा जप देखील एक माळ करायचा आहे आणि ज्या दिवशी स्थापना केलेली आहे त्या दिवशी तुम्ही काहीतरी घरामध्ये गोडधोड पदार्थ करून स्वामींना दाखवायचे आहेत.

स्थापना केल्यानंतर दररोज मग तुम्ही स्वामींची पूजा अर्चना नित्य नेमाने करायचे आहे. स्वामींच्या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य देखील दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आणून त्यांची स्थापना आणि पूजा करू शकता. त्यामुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील.

Leave a Comment