भौम प्रदोष व्रताच्या दिवशी ‘या’ चुका केल्यास तुमच्यावर कोसळेल दुख:चा डोंगर

हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला अत्यंत खास मानले जाते. प्रदोष व्रत दर महिन्याला केले जाते. प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत साजरा केला जातो. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत होते. प्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि तुमचे सर्व महत्त्वाच्या गोष्टी आणि इच्छा पूर्ण करण्यास मदत होते. हिंदू धार्मिक शास्त्रानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी सकारात्मक मनानी महादेवाची पूजा केल्यामुळे आणि उपवास केल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात.

 

धार्मिक श्रद्धेनुसार, प्रदोषाचे उपवास आणि पूजा केल्याने भक्तांना महादेवाचे आशीर्वाद मिळतात. या दिवशी प्रदोष काळात पूजा करणे महत्त्वाचे आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये धन, समृद्धी, आनंद आणि सौभाग्य मिळते. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना महादेवाला काही खास वस्तू अर्पण केल्याने व्यवसायात यश मिळते आणि तुम्हाला आर्थिक फायदा मिळतो. हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की भौम प्रदोषाच्या दिवशी विशेष काळजी घेतली पाहिजे. या दिवशी काही कामे करू नयेत. असे केल्याने उपवासाचे फायदे मिळत नाहीत असे मानले जाते. अशा परिस्थितीत, या दिवशी कोणती कामे करू नयेत ते जाणून घेऊया.

 

हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.47 वाजल्यापासून 26 फेब्रुवारी सकाळी 11.07 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच 2025 मध्ये 25 फेब्रुवारीला पाळला जाणार आहे. यंदा प्रदोष व्रत मंगळवारी येत आहे, या व्रताला भौम प्रदोष व्रत देखील म्हणटले जाईल. प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगावर दूध, दही, मध इत्यादी अर्पण करावे. तसेच, मंत्रांचा जप करावा. शिवपुराणात प्रदोष व्रताचे महत्त्व वर्णन केले आहे. असे मानले जाते की जो कोणी प्रदोष व्रत ठेवतो आणि खऱ्या मनाने भगवान शिवाची पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच, भगवान शिवाच्या कृपेने, मृत्यूनंतर, त्याला शिव लोकांमध्ये स्थान मिळते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने कुंचलीच्या चंद्रदोषापासून मुक्तता मिळते.

 

भौम प्रदोषाच्या दिवशी या गोष्टी करणं टाळा….

भौम प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा करताना तुळशी अर्पण करू नका.

भौम प्रदोष व्रताच्या दिवशी चुकूनही निळ्या रंगाचे कपडे घालू नका.

भौम प्रदोष व्रताच्या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान करू नका.

भौम प्रदोष व्रताच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका आणि कोणाशीही अपशब्द वापरू नका.

भौम प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्यांनी केस आणि नखे कापू नयेत.

शिवलिंगावर या वस्तू अर्पण करा

भौम प्रदोषाच्या दिवशी, पूजा करताना शिवलिंगावर गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करावे. असे केल्यामुळे तुमच्या

आयुष्यामध्ये आणि महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येणार नाहीत. भौम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि तांदूळ अर्पण केल्याने कर्जाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते आणि आर्थिक फायदा देखील होतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा.

भौम प्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही तुळशी, हळद आणि सिंदूर अर्पण करू नयेत. असे केल्यामुळे

तुम्हाला महादेवाचा आशिर्वाद मिळत नाही आणि तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात.

या गोष्टी लक्षात ठेवा :

भौम प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करा.

भौम प्रदोष काळात महादेवाची पूजा करा.

या दिवशी महादेवाच्या नावाचा 108 वेळा जप करा.

या दिवशी फळांचा उपवास ठेवा कोणतेही पदार्थ खाऊ नका.

Leave a Comment