ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांमध्ये सूर्याला राजाचा दर्जा देण्यात आला आहे. सूर्यदेव एका राशीत महिनाभर राहतात आणि त्यानंतर राशी परिवर्तन करतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणाऱ्या प्रक्रियेला संक्रांत म्हंटलं जातं. फेब्रुवारी महिन्यात कुंभ संक्रात आहे. म्हणजेच सूर्यदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ही शनिची स्वरास असून या राशीत शनिदेव याच राशीत गेल्या अडीच वर्षापासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे सूर्याने या राशीत प्रवेश करताच महिनाभर सूर्य आणि शनिची युती पाहायला मिळणार आहे. या युतीत शनिदेव हे सूर्यपेक्षा अधिक प्रभावी असणार आहेत. 12 फेब्रुवारीला कुंभ संक्रात असून सूर्य या राशीत प्रवेश करणार आहे. तसं पाहिलं तर ज्योतिषशास्त्रात सूर्य-शनि अर्थात पितापूत्रांचं एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे अनेकांना धडकी भरली आहे. पण काही राशींचं नशिब या युतीमुळे चमकणार आहे. तर काही राशींना या काळात सांभाळून राहावं लागणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते..
या राशींना मिळणार लाभ
सिंह : सूर्यदेवांनी कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर राशीच्या सातव्या स्थानात असणार आहे. सातवं स्थान हे जोडीदार आणि भागीदारीच्या धंद्याशी निगडीत आहे. या काळात जोडीदाराशी काही छोटे मोठे वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात काळजी घेणं आवश्यक आहे. मात्र शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगच्या माध्यमातून फायदा होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित धंद्यातून अपेक्षित लाभ होऊ शकतो. आरोग्यविषयक तक्रारी दूर होण्याची शक्यता आहे.
धनु : या राशीच्या तिसऱ्या स्थानात सूर्य आणि शनिची युती होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना किचकट कामातही यश मिळेल. सकारात्मक उर्जेने काही न होणारी कामंही पूर्ण होतील. जीवनात प्रगतीचे काही नवे मार्ग सापडतील. राजकीय क्षेत्रात असलेल्या जातकांना एखादं मोठं पद मिळू शकतं. एकंदरीत आर्थिक स्थिती या काळात चांगली राहील.
कन्या : या राशीच्या सहाव्या स्थानात सूर्य आणि शनिची युती होणार आहे. त्यामुळे या काळात देवधर्माची कार्य हातून पार पडतील. अध्यात्मिक प्रगतीची नवी दारं खुली होतील. गुरू दीक्षा या काळात मिळू शकते. दुसरीकडे, काही अवघड कामं सोपी झाल्याने दिलासा मिळेल. प्रेम प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. आवडीच्या व्यक्तीसोबत विवाह होऊ शकतो. आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका