सध्य सामान्यांपासून ते अगदी नेत्यांपर्यंत अन् सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनाच महाकुंभाचे वेध लागले आहे. तब्बल 12 वर्षांनी आलेल्या महाकुंभात करोडोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. महाकुंभात शाहीस्नान करण्याचे महत्त्व प्रचंड आहे. त्यामुळे सर्व भाविक अगदी श्रद्धेन जात आहेत.महाकुंभ स्नानासाठी भाविकांचा संगम देश-विदेशातून लोक स्नानासाठी येत आहेत.
महाकुंभ शाही स्नान याचे काय महत्व आहे? कुंभ स्नान एक साधारण स्नान नसून एक सखोल आध्यात्मिक अनुभव आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा वैश्विक ऊर्जा शिखरावर असते आणि पवित्र नद्यांचे पाणी या उर्जेने भरलेले असते. या पवित्र पाण्यात स्नान केल्याने व्यक्ती केवळ शारीरिक रूपाने शुद्ध होत नाही तर त्याची आत्मा देखील पवित्र होते. असे मानले जाते की कुंभ दरम्यान केलेल्या धार्मिक विधींचे परिणाम अत्यंत शुभ असतात.
पण महाकुंभात गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविक जखमी झाले तर अनेकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे अनेकांना महाकुंभात शाहीस्नानासाठी जाण्याची इच्छा असूनही जाता येत नाही. किंवा अनेकजण या परिस्थितीमुळे जाणे टाळतात. पण तुम्हाला माहितीये का तुमहाला जर महाकुंभात जाणे शक्य नसेल तर घरीच शाही स्नान करून महाकुंभाचे पुण्य कमवू शकता. कसं ते पाहुयात.
घरीच महाकुंभाचे पुण्य कसे कमवायचे? ते म्हणतात ना की देवाच्या ठिकाणी जाणं जमत नसेल तर फक्त डोळे बंद करून मनापासून त्याला हात जोडले तरी आपली भक्ती, श्रद्धा त्याच्यापर्यंत पोहोचते.
तसचं जर तुम्हाला प्रयागराजला जाता येत नसेल तर त्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. जसं की तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाजवळ जर एखादी पवित्र नदी असेल आणि तिथे जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन स्नान करू शकता.
जर तुमच्या आजूबाजूला पवित्र नदी नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता. यातूनही पुण्य प्राप्त होऊ शकते किंवा पवित्र स्नानाचा अनुभव घेऊ शकता.
जर तुम्ही महाकुंभा दरम्यान घरी स्नान करत असाल तर काही नियम याबाबत पाळावे लागतात. तसेच एका खास मंत्राचे पठण तुम्ही करू शकता.यातून चांगले परिणाम मिळतात अस म्हटलं जातं. आधी पाहुयात की घरी शाही स्नान करण्यासाठीचे नियम काय आहेत ते.
घरी शाही स्नान करण्याचे नियम
शास्त्रानुसार कुंभात स्नान करताना किमान पाच स्नान करावे. त्यामुळे घरी देखील आंघोळ करताना त्या पाण्यात तुम्ही गंगाजल, तुळसीची पाने टाकून अंगोळ करू शकता. यावेळी साबण, डिटर्जंट यासारख्या गोष्टींचा वापर करू नये. स्नानानंतर गरजूंना दान करणे शुभ मानले जातं. तसेच तुम्हाला शक्य असल्यास हे स्नान तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर केलं तर अतिशय फलदायी ठरेल. (ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या दोन तास आधीचा काळ. हा काळ रात्रीचा चौथा प्रहर असतो. ब्रह्म मुहूर्त हा काळ सकाळच्या सूर्यापूर्वीचा असतो.)
या मंत्राचे पठण आवर्जून करा
तर अशापद्धतीने तुम्ही अंघोळीचे पाणी काढू शकता. पण यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मंत्र. अंघोळ करताना ते महाकुंभातील पवित्र स्नान माणून करणार असल्यानं मंत्र फार महत्त्वाचे असतात. त्यातील एक मंत्र म्हणजे “गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरू”.
या मंत्राचा उच्चार किंवा पठण करत एक एक जग पाणी अंगावर घ्या. जेणेकरून या मंत्रपठनाने आपल्या भोवती व्हायब्रेशन तयार होतात आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते.
त्यामुळे महाकुंभात जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही घरी स्नान नक्कीच करू शकता. यामध्ये तुमचा विश्वास आणि श्रद्धा फार महत्त्वाची आहे. पौष पौर्णिमेच्या दिवसापासून महाकुंभाला सुरुवात झाली त्यामुळे 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला याची सांगता होईल. म्हणजे एकूण 45 दिवस महाकुंभ असणार आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने घरी पवित्र स्नान घेऊ शकता.