ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र ग्रहाला मनाचा कारक ग्रह मानले जाते. नवग्रहांमध्ये चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जलद गतीने राशी परिवर्तन करतो. त्यामुळे नेहमीच चंद्राची कुठल्या ना कुठल्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते, बऱ्याचदा या युतीमुळे राजयोग देखील निर्माण होतात. अशातच आता मंगळ आणि चंद्राची युती निर्माण होत आहे, ज्यामुळे महालक्ष्मी योग निर्माण होईल. हा योग खूप शुभ मानला जातो. या योगाच्या प्रभावाने व्यक्तीला आयुष्यात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा, धन-संपत्ती प्राप्त होते.
पंचांगानुसार, चंद्र २७ ऑगस्ट रोजी सकाळी ३ वाजून ४१ मिनिटांनी मिथुन राशीमध्ये प्रवेश केला असून तो ३० ऑगस्ट रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीमध्ये आधीपासून मंगळ ग्रह विराजमान आहे ज्यामुळे या राशीत महालक्ष्मी योग ३० ऑगस्टपर्यंत राहील.
महालक्ष्मी योग करणार मालामाल
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी महालक्ष्मी योग खूप शुभ परिणाम देणारा ठरेल. या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. धनलाभ होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुमची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसह चांगला वेळ घालवाल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात आनंदी आनंद निर्माण होईल.
धनु
धनु राशींच्या व्यक्तींसाठी हा महालक्ष्मी योग सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. व्यापाऱ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमची पगारवाढ होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल.