ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि शनि ग्रह व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. या दोन्ही ग्रहामध्ये थोडा जरी बदल झाला तरी राशीचक्रातील १२ राशींवर याचा मोठा परिणाम पडतो. राहु शनि मेष पासून मीन राशीपर्यंत सर्व राशींवर याचा परिणाम दिसून येतो. आता राहु आणि शनि एकत्र येऊन दुर्मिळ असा योग निर्माण करत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, राहुने ८ जुलै २०२४ रोजी शनिच्या उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. राहु शनिच्या नक्षत्रात जवळपास १८ महिने विराजमान राहणार. राहुचा शनिच्या नक्षत्रात येण्याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येईल पण तीन राशी अशा आहेत ज्यांच्यावर १८ महिने शनिची कृपा दिसून येईल. जाणून घेऊ या, या दरम्यान त्या तीन राशी कोणत्या आहेत?
वृषभ राशी
वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शनि राहुबरोबर शुक्र ग्रहाची मैत्री आहे. अशात शनि राहुचा हा संयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. या दरम्यान या लोकांना नोकरीमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. राहु आणि शनिच्या प्रभावामुळे हे लोक कोणताही मोठा व्यवहार करण्यास सक्षम दिसून येईल ज्यामुळे भविष्यात या लोकांचा फायदा होईल. कमाईमध्ये वृद्धी होईल.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी शनि राहुचा संयोग लाभदायक ठरू शकतो. या दरम्यान या लोकांना धन संपत्ती, धैर्य आणि आत्मविश्वास वाढू शकते. या लोकांना आकस्मित धनलाभ होऊ शकतो. मकर राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी पगारात वाढ होऊ शकते व त्यांची प्रगती होईल. व्यवसायासाठी ही संधी फायद्याची ठरू शकते.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांवर शनि राहुची कृपा दिसून येईल ज्याचा लाभ त्यांना होणार. या लोकांना नशीबाची साथ मिळेल. कोणत्याही कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. वडिलांची संपत्ती या लोकांना मिळू शकते. नोकरीसाठी नवीन प्रस्ताव येऊ शकतात. कोणत्याही प्रकारची शुभ वार्ता मिळू शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ हे लोक घालवू शकतात. प्रवासाचे योग जुळून येतील.