ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करुन इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. अशातच आता मार्च महिन्याच्या अखेरीस शुक्रदेव मीन राशीत गोचर करणार आहेत तर तिथे आधीपासूनच राहू विराजमान आहेत. त्यामुळे शुक्र आणि राहूची युती मीन राशीत होणार आहे. ही युती २४ एप्रिलपर्यंत राहील. अशा परिस्थितीत या दोन ग्रहांच्या युतीचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. परंतु ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच करियर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला तर मग या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ?
वृषभ राशी
राहू आणि शुक्राच्या युतीमुळे वृषभ राशीच्या लोकांना या काळात चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासाठी खुले होऊ शकतात. या काळात तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला यश मिळू शकतो. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येऊ शकते. या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना राहू आणि शुक्राच्या युतीमुळे मोठा फायदा होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक आणि स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकतो. व्यवसाय करत असलेल्या लोकांना या काळात एक चांगला गुंतवणूकदार मिळू शकतो. तुम्हाला कुठूनतरी अचानक पैसे मिळू शकतात. या काळात तुमच्या कुटुंबात सुख-शांति नांदू शकते.
तूळ राशी
राहू आणि शुक्राच्या युती तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणारी ठरु शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. परदेशात जाण्याचे किंवा परदेशी कंपनीत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. एखादे प्रलंबित सरकारी काम पूर्ण होऊ शकते. या काळात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. आपल्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.