वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज, १८ मार्चला सोमवारच्या मुहूर्तावर शनी देवाचा उदय होणार आहे, शनीचा उदय झाल्याने मागील काही कालावधीत निद्रिस्त असलेले शनी महाराज शक्तिशाली होऊन पुन्हा जागृत होतील. शनीदेव १७ जानेवारी २०२३ पासून कुंभ राशीतच स्थित आहेत त्यामुळे आजचा उदय सुद्धा कुंभेतच होणार आहे. शनीच्या या उदयाचा प्रभाव १२ राशींवर कमी अधिक, शुभ- अशुभ स्वरूपात दिसून येऊ शकतो पण ६ अशा राशी आहेत ज्यांना या कालावधीत प्रचंड लाभ होण्याचे संकेत आहेत.
या मंडळींच्या आर्थिक स्थितीला शनी महाराज असा काही वेग देतील की ज्यामुळे या राशीचे लोक येत्या शनी जयंतीच्या आधीच करोडपती होऊ शकतात. बँक बॅलन्स सह तुमच्या प्रगतीला वेग देणारा हा उदय नेमक्या कोणत्या राशींना फायदेशीर ठरणार आहे हे पाहूया..
आज शनी उदय, १२ पैकी तब्बल ६ राशी होणार प्रचंड धनी
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
मेष राशीच्या मंडळींना शनीचा उदय हा कामाच्या ठिकाणी लाभदायक ठरणार आहे. आपल्याला या कालावधीत कामाच्या ठिकाणी प्रमोशन लाभू शकते. इतकेच नाही तर नव्या कामाची संधी सुद्धा आपल्याकडे चालून येईल. नवीन संधीसह पगारवाढीचा संकेत आहे. आर्थिक पाठबळ वाढेल. व्यवसाय असल्यास तुम्हाला मागील सर्व कर्मांची शुभ फळे या कालावधीत मिळू शकतात. आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहेत. सध्या शुक्र सुद्धा कुंभ राशीत स्थिर आहेत. शनी व शुक्राचे नाते मित्रत्वाचे आहे. शनीचा उदय आणि त्याच वेळी झालेली शुक्र- शनी युती ही वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. या कालावधी तुमच्यासाठी सुद्धा सुवर्ण काळ सुरु होऊ शकतो. नोकरीसह तुम्ही स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करू शकता, ज्यमार्गातून धनलाभाचे योग आहेत. तुम्हाला गुंतवणूक यावेळी खूप फायद्याची ठरू शकते. रखडलेली ‘येणी’ प्राप्त होतील.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीला शनी उदयामुळे मोठा लाभ होऊ शकतो. आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या कामात ज्यासाठी आपण मागील काही वर्षे प्रयत्न केले आहेत त्यात अचानक वेग जाणवेल व काम सुद्धा यशस्वी होऊ शकेल. राजकारणात सक्रिय असणाऱ्या मंडळींना हा काळ शुभ असणार आहे. आपल्याला बचतीची टक्केवारी वाढेल.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
शनीचा उदय आपल्या झोपलेल्या नशिबाला जाग देईल. आपली अडकून पडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. भागीदारीमध्ये केलेल्या कामाचा फायदा होऊ शकतो. व्यवसायाला गती लाभेल. तुमच्या आई- वडिलांची काळजी घ्या. भावंडांशी जुळवून घेणे हिताचे ठरेल. जोडीदाराच्या रूपात लक्ष्मी माता व विष्णू देवाचा आशीर्वाद लाभू शकतो.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
शनी उदय कन्या राशीसाठी भाग्योदयाचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून चालू असलेली दूषित स्थिती निवळेल. तुमचे कौतुक होऊ शकते. नोकरीत पदोन्नतीची संधी आहे. गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
धनु राशीसाठी शनी उदय पद- प्रतिष्ठा घेऊन येणार आहे. व्यापारी वर्गाला एखादा मोठा करार पूर्ण करता येऊ शकतो. धनलाभाच्या सह मान- सन्मान वाढू शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीच्या मार्फत आपल्याकडे लक्ष्मीचे वरदान येणार आहे. बँक बॅलन्स वाढल्याने तुमच्या काही अडगळीत पडलेल्या इच्छा पूर्ण करता येऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)