लहान मुलांचा कसलाही खोकला, घशामध्ये खवखव, घसा दुखणे कमी करणारे काही घरगुती उपाय

 

 

मित्रांनो लहान मुलांमध्ये सर्दी झाली की खोकला हा होतोच याचा त्रास रात्र झाली की खूपच वाढतो आणि कप असल्यामुळे सारखी खोकल्याची उबळ येऊन घसा देखील खवखवतो.

 

मित्रांनो यामुळे लहान मुलं झोप न आल्यामुळे चुडी बनतात खोकल्यामुळे त्यांना जेवण जात नाही यासाठीच आपण आज घरगुती काही उपाय पाहणार आहोत.

 

मित्रांनो लहान मुलांना खोकला झाला असेल आणि छातीत कफ असेल तर थोडी काळी मिरी आणि लवंग घ्या. त्यामध्ये दोन्ही व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर मिक्सर मध्ये त्याची पूड करून घ्या.

 

मित्रांनो थोडीशी पूड अर्धा चमचा मधामध्ये मिक्स करून ती मुलांना चाटायला द्या. हा प्रयोग तुम्ही रात्रीच्या वेळेस करा पण यानंतर त्याला काही खायला किंवा लगेच पाणी वगैरे प्यायला देऊ नका.

 

मित्रांनो आता दुसरा उपाय थोडी काळी मिरी घ्या. तव्यामध्ये छान भाजुन घ्या आणि त्याची पूड करून घ्या. यामध्ये सुंठ पावडर मिक्स करा. काळी मिरी पावडर आणि सुंठ पावडर पाव चमचा घ्यायची आहे. अर्धा चमचा मधामध्ये सुंठ आणि मिरी पावडर घालून मिश्रण करा.

 

आणि बाळाला हे दिवसातून तीन ते चार वेळा चाठवण द्या नेहमी त्याला गरम पाणी प्यायला द्या हे चाटण खाल्ल्यानंतर अर्धा तास नंतर त्याला काही खायला देऊ नका.

 

मित्रांनो अजून एक सोपा उपाय म्हणजे आल किंवा अद्रक. आल तुम्ही किसून घ्या आणि त्याचा तीन ते चार थेंब रस घ्या आणि तो अर्धा चमचा मधामध्ये मिक्स करून मुलांना खायला द्या यामुळे ही खूप फरक पडेल.

 

मित्रांनो वरचे उपाय दिले आहेत ते एक वर्षाच्या वरील बाळांसाठी आहेत. आता आपण पाहूया सहा महिने ते एक वर्ष बाळासाठी उपाय. मित्रांनो एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये दोन लवंगा दोन काळीमिरी 5-6 तुळशीची पानं आणि आल्याचा एक छोटासा तुकडा घालून हे पाणी उकळवा.

 

पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्या. त्यानंतर हे पाणी एक तास तसेच ठेवावे. एक तासानंतर त्यामध्ये आपण घातलेल्या औषधी वनस्पतींचा अर्क त्यामध्ये उतरला जाईल. दिवसातून दोन ते तीन वेळा एक चमचा काढा प्यायला द्यावा.

 

ही माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

 

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment