पौष महिन्यातील पहिल्या शनिवारी कोणत्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडून येतील याचा एक आढावा. तुम्ही आजच्या दिवसात राशीनुरुप काय जपावं जाणून ठरवा आजचे कार्यक्रम.
मेष:-आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.
वृषभ:-कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता.
मिथुन:-घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल.
कर्क:-शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल.
सिंह:-बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
कन्या:-आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील.
तूळ:-बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते.
वृश्चिक:-गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
धनू:-दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात.
मकर:-आपल्या कामाची योग्य दखल घेतली