ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येला लागणार आहे. शिवाय ते नवरात्रीच्या एकदिवस आधी लागणार असल्यामुळे अनेक राशीच्या लोकांना त्याचा फायदा होणार असून त्यांच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. ज्योतिषांच्या मते, हा एक अत्यंत दुर्मिळ योग आहे. शिवाय हा योग जवळपास १७८ वर्षांनी जुळून येत असल्याचंही मानलं जात आहे. त्यामुळे २०२३ मधील शेवटचे सूर्यग्रहण कोणत्या राशींसाठी खास ठरु शकते ते जाणून घेऊ या.
यावर्षी १४ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण होत आहे. जे खूप खास मानले जात आहे. कारण या ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि बुध दोघेही कन्या राशीत असणार आहेत. अशा स्थितीत बुधादित्य योग तयार होत आहे. तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी यापुर्वी १८८५ साली सूर्यग्रहण लागले होते. जे आता १७८ वर्षांनंतर पुन्हा लागणार आहे. हे ग्रहण शनिवारी लागणार असल्याने त्याला शनी अमावस्यादेखील म्हटलं जात आहे.
मिथुन रास (Mithun Zodiac)
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण मिथुन राशीच्या लोकांना विशेष लाभ देऊ शकते. या काळात तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जीवनात अनेक प्रकारचे आनंद मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता.
मकर रास (Makar Zodiac)
मकर राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा विशेष लाभ मिळू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. अनेक प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला आर्थिक संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
तूळ रास (Tula Zodiac)
वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण तूळ राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकते. या राशीच्या लोकांना समाजात मान-सन्मान मिळू शकतो. या काळात तुम्हाला व्यवसायात अफाट यश मिळून मोठी कामे करता येऊ शकतात. पैशाशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात तसेच तुम्ही बचतही करु शकता. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला लाभ होऊ शकतो.
तूळ रास (Tula Zodiac)