पुढील महिन्याच्या सुरुवातीला ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु होणार : शुक्र कन्या राशीत प्रवेश करताच मिळू शकतो गडगंज पैसा

मित्रांनो

शुक्र ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतो. शुक्र हा प्रेम आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीच्या जीवनावर काही ना काही प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र २ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १२ वाजून ४३ मिनिटांनी सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

तर तो ३ नोव्हेंबरपर्यंत याच राशीत राहणार आहे. त्यानंतर तो कन्या राशीत प्रवेश करेल. शुक्र सिंह राशीत असल्यामुळे अनेक राशींच्या पद, प्रतिष्ठा आणि संपत्तीत वाढ होऊ शकते. शुक्राचा सिंह राशीत प्रवेश कोणत्या राशींना फायदेशीर ठरु शकतो ते जाणून घेऊ या.

मेष राशीच्या पाचव्या स्थानी शुक्र प्रवेश करणार आहे. जे या राशीच्या लोकांसाठी ते अनुकूल ठरु शकते. या काळात तुम्ही कुटुंबाबरोबर वेळ घालवू शकता. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, परंतु खर्चही वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. जे तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करु शकता. व्यवसायातही नशीब तुमची साथ देऊ शकते, कामानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास घडू शकतो.

वृषभ रास

या राशीच्या लोकांना शुक्र गोचरचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात. जर तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर तुम्ही ते या कालावधीत खरेदी करू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायातही तुम्हाला लाभ होऊ शकतो. तसेच तुम्ही कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. वैवाहिक जीवनातही तुम्हाला आनंद मिळू शकतो. संपत्ती वाढल्याने समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

सिंह राशीत शुक्राचे गोचर होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून पैसा कमावण्याची संधी मिळू शकते. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. काही लोकांना या काळात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरदारांची त्यांच्या वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते आणि चांगल्या कामगिरीच्या आधारे तुमचे प्रमोशन होऊ शकते. व्यवसायात यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो.

Leave a Comment