मित्रानो, भगवान शंकराला ऊर्जेचे रूप मानले जाते आणि ते दुःखांचा नाश करणारे आहेत. सोमवार हा विशेषतः भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात. या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करायचा असल्यास सोमवारी सायंकाळी काही विशेष उपाय केले पाहिजे. आजचा हा लेख त्याच विषयावर असून या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सोमवारच्या उपायांविषयी माहिती.
भगवान शंकराची कृपा हवी असेल तर सोमवारी सायंकाळी काही खास उपाय करावेत. सोमवारी सायंकाळी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे. यासोबत ‘ओम नमः शिवाय’चा जप करावा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.
सोमवारी संध्याकाळी मंदिरात जाऊन शिवलिंगाला मध अर्पण करा. असे केल्याने नोकरी-व्यवसायातील समस्या संपतात.
भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावावा. चंदनाचा स्वभाव शीतल असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही.
भगवान शंकराची पूजा करताना अक्षत, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
सोमवार हा भगवान भोलेनाथला समर्पित आहे. असे मानले जाते की सोमवारी भगवान शंकराची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. निर्धारित वेळेत नियमितपणे भगवान शिवाची पूजा करावी.
अथक परिश्रम करूनही धनसंचय होत नसेल तर सोमवारी रात्री शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा. तुम्हाला हे 41 दिवस नियमित करावे लागेल. असे केल्याने शिवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.