मित्रानो, आज शनिवार उद्या रविवारी सूर्य देवाच्या कृपेने या राशी मोठ्या चमकणार आहेत. या राशींना पंचांग शास्त्रानुसार सर्व ग्रहमान अनुकूल आहेत. त्याचबरोबर सूर्य देवाची कृपा असल्याने लॉटरी लागणे, जुने येणे वसुली, प्रेमात सफलता, संतान प्राप्ति, याचबरोबर वाहन खरेदी ची देवाण-घेवाण चांगली होऊन मोठी रक्कम प्राप्त होणे अशा अनेक गोष्टी घडल्याने त्याचे नशीब आज चमकणार आहे. उर्वरित राशीसाठी उद्यापासून त्यांनाही आज ग्रहमान अनुकूल आहेत.
मेष राशी
आपल्या वजनावर लक्ष ठेवा, अतिखाण्यात आनंद मानू नका. तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार घ्यालच परंतु, यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. पण तुम्ही शांतपणे सर्व घटनांचा विचार करून परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवावी. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल.
जीवनसाथीला खिन्नता होईल कारण, तुम्ही त्यांच्या सोबत बोलण्यात काही ही आवड दाखवणार नाही. तुमचे नातेसंबंध कमकुवत होतील. तुमच्या गोष्टी आज तुमच्या जवळच्यांना समजणार नाही त्यामुळे तुम्हाला चिंता वाटेल.
वृषभ राशी
प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात. लहान भाऊ बहिणींसोबत फिरायला जाऊ शकतात यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये उत्तमता येईल.
मिथुन राशी
तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील, तुमच्याभोवती सगळेच लुकलुकत असेल; कारण तुम्ही प्रेमात पडला आहात! आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका कारण, बऱ्याच वेळा तुम्ही मन मारून आपला किमती वेळ बर्बाद करतात. आज ही तुम्ही असे काही करू शकतात.
कर्क राशी
आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य तुम्हाला मिळेल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमचा/तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.
सिंह राशी
भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. या जगातली सर्वोच्च परमानंद हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्तींना मिळालेला असतो. तुम्ही ते नशीबवान आहात. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते.