ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो. ग्रहांच्या या संयोगामुळे अनेक प्रकारचे राजयोग तयार होतात. तयार होणारा राजयोग राशीच्या सर्व 12 राशींवर परिणाम करतो. राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात सकारात्मक बदल होतो.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणताही ग्रह किंवा नक्षत्र जेव्हा विशिष्ट स्थितीत येतो तेव्हा राजयोग तयार होतो. मंगळ ग्रह 18 सप्टेंबर 2023 पर्यंत कन्या राशीत असणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे कन्या राशीत विपरीत राजयोग तयार झाला आहे. या विपरित राजयोगाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार असून काही राशी आहेत ज्यांना त्याचा खूप फायदा होईल. जाणून घेऊया विपरित राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींचे अच्छे दिन येणार आहेत.
मेष रास
ज्योतिष शास्त्रानुसार कन्या राशीत तयार झालेला विपरिता राजयोग मेष राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहेत. या राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. आर्थिक समस्याही दूर होतील. या कालावधीत तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळेल. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनातील समस्या संपतील.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. या योगाच्या शुभ प्रभावामुळे या काळात आत्मविश्वास मजबूत राहणार आहे. कामाच्या ठिकाणी यशासोबतच इतर क्षेत्रातही यश मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ भाग्यवान ठरेल. पैशाची बचत करण्यात यशस्वी होणार आहात. व्यवसायात उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांवर विपरीत राजयोगाचा विशेष प्रभाव पडणार आहे. या काळात धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभाच्या काही संधी मिळणार आहेत. व्यवसाय आणि नोकरीतही मोठा आर्थिक लाभ होण्याची चिन्ह आहेत. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ आहे. व्यावसायिकाला मोठा आर्थिक लाभ होईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.