मित्रानो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव हे आयुष्य, दुःख, आरोग्य, विज्ञान, श्रम- कर्म व न्यायाचे देवता मानले जातात. त्यामुळेच शनीच्या स्थितीतील लहानसा बदल सुद्धा सर्व १२ राशींच्या आयुष्यात उलथापालथ करून जातो असा समज आहे. यंदाचे वर्ष हे शनीच्या सर्वात महत्त्वाच्या हालचालींचे वर्ष आहे. १७ जानेवारी २०२३ ला शनिदेव स्वराशीत म्हणजेच कुंभमध्ये प्रवेश घेऊन स्थिर झाले होते.
यानंतर सहा महिन्यांनी म्हणजेच १७ जून २०२३ ला शनी पुन्हा वक्री अवस्थेत आले आहेत. आणि आता आज म्हणजेच २९ ऑगस्ट २०२३ ला शनीची शक्ती ही सर्वात जास्त असणार आहे. साहजिकच याचा कटू- गोड प्रभाव हा सर्वच राशींवर पाहायला मिळू शकते. पण त्यातही तीन अशा राशी आहेत ज्यांच्यासाठी शनिदेव सोन्याच्या संधी घेऊन आले आहेत. या मंडळींना प्रचंड धनलाभासह कोट्याधीश होण्याची सुद्धा संधी आहे. या नशीबवान राशी कोणत्या चला पाहूया …
वृषभ रास
शनिदेव पॉवरफुल होऊन वक्री चाल करत असताना वृषभ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. या मंडळींना प्रत्येक कामामध्ये नशिबाची तगडी साथ लाभू शकते. आपल्या कामाच्या ठिकाणी प्रशंसा झाल्याने तुम्हाला आकाश ठेंगणे झाल्यासारखे भासेल. आपल्याला शेती/ जमीन संबंधित व्यवहारातून भरपूर मोठा लाभ होण्याची चिन्हे आहेत. धनधान्य आपल्या घराला समृद्ध करेल. तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते.
मिथुन रास
मिथुन राशीसाठी तर यंदाचे वर्ष म्हणजे दुधात साखर असा योग आहे. या वर्षीच आपल्या राशीला शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळाली आहे. त्यात आता शक्तिशाली शनी पुन्हा आपल्या राशीच्या भाग्य स्थानी आले आहेत. यामुळे येत्या काळात आपल्या नातेसंबंधांमध्ये खूप सुधार होऊ शकतात. विशेषतः तुमच्या वडिलांचे आरोग्य उत्तम राहू शकते. आपल्याकडून नकळत झालेल्या एखाद्या कामातून मोठं यश हाती लागू शकतं. तुम्हाला गुंतवणुकीतून धनप्राप्तीचे योग आहेत.
तूळ रास
पॉवरफुल शनीदेव आपल्या राशीच्या कुंडलीत शुभ स्थानी आल्याने तुम्हाला हा येणारा कालावधी सुद्धा लाभाचा सिद्ध होऊ शकतो. एखादा वादातीत असणारा मुद्दा तुम्हाला खरं सिद्ध करून तुमचा समाजातील मान- सन्मान वाढवू शकतो. आजारातून मुक्ती मिळवून देणारा असा हा कालावधी आहे. तुमच्या आयुष्यात एखाद्या नव्या पाहुण्याची एंट्री होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सुद्धा शुभ वार्ता कानी येऊ शकते. एखाद्या मैत्रिणीच्या/मित्राच्या रूपात अचानक लक्ष्मीचे आपल्यावरील आशीर्वाद आणखीन वाढू शकतात.