हिंदू धर्मात पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. ज्यामुळे काही ठराविक वाराला किंवा दिवशी देवाची पूजा केली जाते. काही घरांमध्ये तर दररोज देवाची पूजा केली जाते. याबद्दल असा एक समज आहे की, जे लोक प्रामाणिक मनाने आणि पूर्ण भक्तीने पूजा करतील, त्यांच्यावर देव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. परंतु हे देखील लक्षात ठेवा की, या काळात केलेली छोटीशी चूकही पूजेचे पूर्ण फळ देत नाही. अशा वेळी पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
चला तर जाणून घेऊ या की, पुजा करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करु नयेत.
देवाला काहीही अर्पण करताना नियमांचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. असे म्हटले जाते की, देवाला आपल्या हातात दिलेले फुल आवडत नाही, तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले चंदन आणि प्लास्टीकच्या भांड्याच ठेवलेले गंगाजल कधीही अर्पण करु नका. देवाला नेहमी तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यातच पाणी अर्पण करावे.
पूजा करताना कोणत्या देवतेला काय अर्पण करावे आणि कोणते करू नये हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, पूजा करताना भगवान विष्णूला तांदूळ, गणेशाला तुळस आणि माँ दुर्गाला दुर्वा अर्पण करु नका. याशिवाय चुकूनही सूर्यदेवाला बिल्वपत्र अर्पण करू नका. असे केल्याने देव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होतात.
पूजा करताना देवासमोर दिवा लावला जातो. मात्र पुजा करताना हा दिवा अनेक वेळा विझतो. पूजा करताना हा दिवा चुकूनही विझू देऊ नका. हे शुभ मानले जात नाही.
दिव्याला दिवा लावून तो जळवू नका- अनेक वेळा एखादी व्यक्ती नकळत काही चुका करते, ज्यामुळे भविष्यात त्याच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. शास्त्रानुसार पूजा करताना दिवा लावताना अनेकदा लोक ही चूक करताना दिसले आहेत. दिव्याने कधीही दिवा लावू नये, अशी श्रद्धा आहे. असे केल्याने माणूस गरिबीकडे जातो.
ज्योतिष शास्त्रानुसार पूजेच्या वेळी हातात सोन्याची अंगठी कधीही घालू नका. तसेच कोणत्याही शुभ कार्यात दुसऱ्या व्यक्तीची अंगठी घेऊ नये.
घरातील कोणत्याही पूजाविधी किंवा हवन इत्यादी वेळी पत्नीला उजव्या हाताला बसवावे. त्याचवेळी अभिषेक करताना, ब्राह्मणांचे पाय धुतांना आणि सिंदूर दान करताना पत्नीने डाव्या बाजूला बसावे.