भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह 7 ऑगस्टला राशी परिवर्तन करणार आहे. मिथुन राशीतून कर्क राशीत सकाळी 10 वाजून 37 मिनिटांनी प्रेवश करेल. विशेष म्हणजेच वक्री अवस्थेतच शुक्र कर्क राशीत येणार आहे. या काळात शुक्र अस्तावस्थेत असणार आहे. 19 ऑगस्टला सकाळी 5 वाजून 21 मिनिटांनी शुक्रोदय होईल. 1ऑक्टोबरपर्यंत शुक्र या राशीत ठाण मांडून बेसले.
त्यानंतर 2 ऑक्टोबरला रात्री 1 वाजून 18 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्र कर्क राशीत जवळपास 57 दिवस राहणार आहे. शुक्राची स्थिती अशी असताना लक्ष्मीची कृपाही राहील. कर्क राशीत शुक्र शुभ स्थितीत असेल तर मेष राशीतील गुरुची दृष्टी कर्क राशीवर असेल. त्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. पाच राशीच्या जातकांना याचा लाभ मिळेल.
कर्क : या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. काही गोष्टींवर पैसा खर्च होईल. पण तो योग्य कारणासाठी असेल हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी केलेली गुंतवणूक भविष्यात फलदायी ठरेल. देवदर्शनाचा योग जुळून येईल. कुलदेवी आणि कुलदैवताचं दर्शन घ्याल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.
मिथुन : गेल्या काही दिवसांपासून असलेली आर्थिक अडचण दूर होईल. या कालावधीत पैशांची बचत करण्यात यश मिळेल. आत्मविश्वास वाढल्याने बोलण्याची शैली बदलून जाईल. तुमच्या वाणीचा इतरांवर सकारात्मक प्रभाव पडेल.
कन्या : तुम्ही आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. काही योजनाही यशस्वीरित्या पार पाडाल. त्यामुळे वरिष्ठांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. मुलांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळेल. त्यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळेल.
तूळ : कामाच्या ठिकाणचा ताण दूर झाल्याने एकदम शांत वाटेल. सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. इतरांसोबत संबंध चांगले राहतील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. भौतिक सुखांची अनुभूती या काळात घेता येईल.
मकर : केलेल्या परिश्रमाचं योग्य फळ तुम्हाला या काळात मिळेल. अडकलेला पैसा मिळाल्याने अडचण दूर होईल. मुलांसोबत चांगले क्षण व्यतीत कराल. उगाच वाद होईल असं वागू नका. सामंजस्यपणे घ्या आणि मार्ग काढा.