तब्बल 19 वर्षांनी अद्भूत संयोग जुळून आला आहे. यंदा श्रावण आणि अधिकमास एकत्र आला आहे. त्यामुळे यंदा श्रावण दोन महिने असणार आहे. अधिकमासला मलमास किंवा पुरुषोत्तम महिना देखील म्हटलं जातं.
महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो.
या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांचा रितसर पूजा अर्चा करुन पंचपक्वाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिकमासाचं वाण दिलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे की अधिक मासात जावयाला एवढं महत्त्व का असतं ते?
चैत्रापासून फाल्गुनापर्यंत म्हणजे 12 महिन्यात 355 दिवस असतात, तर नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस हे 365 दिवस असतात. याचा अर्थ 10 दिवस तीन वर्षांनी 30 झाल्यावर अधिकचा महिना येतो. वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनंतर म्हणजे साधारण 33 महिन्यांनंतर येत असतो. म्हणून या महिन्यात 33 या आकड्याला तेवढंच महत्त्व आहे. म्हणून या महिन्यात 33 वस्तूचं दान, वाण, जणांना अन्नदान, जोडप्यांसह सामुहिक पूजा केली जाते.
तर हिंदू धर्मानुसार विवाह प्रथेनुसार जावयाला नारायणाचं रुप मानलं जातं. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात जावयाला नारायण रुप मानून पूजा केली जाते. म्हणून हिंदू धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचं रुप मानलं जातं. म्हणून अधिक मासात जावयाला तूपातील 33 अनारसे दिले जातात. एका चांदी किंवा तांब्याच्या ताटात हे अनारसे सजवून त्यात तुपाचा दिवा लावून हे वाण जावयाला दिलं जातं. यालाच जावयाचं वाण असं म्हणतात.
मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी दिप दानाला महत्त्व आहे. म्हणून जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीवार्द मिळतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल चांदीचं का द्यावं तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं.
जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात. म्हणूनतुम्हा जावयाला अधिक मासात नक्की घरी बोलवा त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवा त्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तासेसोबत एक चांदीचं निरांजन देऊन. 33 दिव्याने जावयाला नक्की औक्षवान करा.