स्वप्न पाहाणं ही एक सर्वसामान्य प्रक्रीया आहे. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्नं पाहातात.कधी एखादं भयानक स्वप्न आपल्याला झोपेतून खडबडून जागं करतं तर कधी एखादं मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरुन हसवतं.
कधी एखादं गूढ स्वप्न आपल्याला विचार करायला भाग पाडतं तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत.
स्वप्नात एखाद्याच्या पायाला स्पर्श करण्याचा काय अर्थ असतो याबद्दल आपण आज बोलणार आहोत.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या चरणांना नम्रपणे स्पर्श करताना दिसलात तर ते स्वप्न म्हणजे प्रगतीचा मार्ग उघडण्याचे लक्षण आहे असा त्याचा अर्थ होतो.
जर तुम्हाला स्वप्नात एखाद्याच्या पायाला स्पर्श करताना दिसलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचे विरुद्ध ग्रह नक्षत्र आता तुम्हाला अनुकूल होणार आहेत.
तुमच्या स्वप्नात ज्येष्ठांच्या पायाला स्पर्श करणे हे तुमच्यातील आदर, नम्रता आणि नम्रतेचे भाग जागृत होण्याचे लक्षण आहे.
स्वप्नात एखाद्याच्या पायाला स्पर्श करणे हे त्या व्यक्तीची आभा तुमच्या आभेमध्ये शोषून घेऊन स्वतःला अधिक उत्साही बनवण्याचे ते लक्षण आहे असा त्या स्वप्नाचा अर्थ होतो.
पायाच्या बोटातून शक्ती प्रसारित होत असते. त्यामुळे स्वप्नात जर तुम्ही कोणाच्या अंगठ्याला स्पर्श करत असाल तर ते जीवनातील अंधकाराचा नाश होऊन सौभाग्य, वय, सामर्थ्य, ज्ञान, कीर्ती वाढण्याचे लक्षण मानले जाऊ शकते. यामुळेच सकाळी उठल्यावर भारतीय शास्त्रात आपल्या आईवडीलांच्या पाया पडणे किंवा त्यांच्या पायाचा अंगठा आपल्या कपाळाला लावणे महत्वाचे मानले गेले आहे.