बुध ग्रह हा बुद्धिमत्ता आणि संवादाचा कारक मानला जातो. बुध ग्रहाची हालचाल नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता वाढवणारी मानली जाते. ७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजून ४ मिनिटांनी बुध मीन राशीत मार्गी झाले आहेत. बुध मार्गी होताना सरळ गतीने मार्गी झाले आहे. या गतीमधील बदलाचा परिणाम शिक्षण, दूरसंचार आणि व्यापारावर होईल. मीन राशीत शनीदेव असल्याने बुध आणि शनीदेव एकत्र आले आहेत. बुधाची सरळ चाल कोणत्या राशींसाठी बक्कळ लाभ घेऊन येणारी ठरेल, चला तर जाणून घेऊया…
‘या’ राशींना होणार मोठा फायदा?
वृषभ
बुधदेवाची सरळ चाल वृषभ राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना चांगले फायदे मिळू शकतात. करिअरमध्ये तुम्ही नवीन उंची गाठू शकाल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.
मिथुन
बुधदेवाची सरळ चाल मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तुम्हाला सापडू शकतात. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना यावेळी पदोन्नती मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
सिंह
बुधदेवाची सरळ चाल सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. वाहन आणि मालमत्ता मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये कुटुंबीयांचं सहकार्य मिळू शकते. जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला कुटुंब आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून फायदा होऊ शकतो. तसेच इतर माध्यमातून पैसे मिळू शकतात.
तूळ
बुधदेवाची सरळ चाल तूळ राशीच्या लोकांसाठी आनंदवार्ता घेऊन येणारी ठरू शकते. येत्या दिवसात या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या घरात नवीन वाहन येऊ शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील.
धनू
बुधदेवाची सरळ चाल धनू राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देणारी ठरू शकते. अविवाहित आहेत, त्यांचं लग्न जुळण्याची शक्यता आहे. रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. प्रत्येक कामांमध्ये नशिबाची साथ मिळू शकते. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे.