विवाहीत महिलांनी सिंदूर का लावावा ?

शास्त्रात सांगितलेल्या सोळा अलंकारांपैकी सिंदूर किंवा कुंकू हे सर्वात महत्त्वाचे आहे. विवाहित महिलांच्या डोक्याला लावलेला सिंदूर हे त्यांच्या विवाहित असण्याचे प्रतीक आहे. केसांमध्ये, भांग पाडतो तिथे कुंकू लावल्याने जोडीदाराप्रती असलेला आदर, प्रेम आणि समर्पण दिसून येते. त्यामुळेच हिंदू संस्कृतीत विवाहित महिलांनी कुंकू अथवा सिंदूर लावणे अनिवार्य मानले जाते.

 

पण आजच्या आधुनिक काळात काही स्त्रिया लग्नानंतरही केसांना सिंदूर लावत नाहीत किंवा काहीजणी फक्त नावापुरता थोडंसं कु्ंकू अथवा सिंदूर लावतात. धर्मग्रंथ आणि ज्येष्ठांच्या मते हे चुकीचे मानले जाते. सिंदूरचा विवाहित स्त्रीच्या सौभाग्याशीही संबंध आहे, त्यामुळे त्याचा योग्य वापर केला पाहिजे. सिंदूर लावल्याने अखंड सौभाग्याचे वरदान मिळते.

 

आजही घरातील वडीलधाऱ्या महिला या विवाहित स्त्रियांना भांगामध्ये नीट कुंकू लावायला सांगतात, मात्र कपाळ तसंच उघडंबोडकं ठेवलं तर त्या नावे ठेवतात. तुमच्या आजी-पणजीने घालून दिलेला हा नियम तुम्हाला विचित्र वाटू शकतो. तुम्हाला ते मिथक वाटू शकते. पण आजीच्या या मान्यता, धार्मिक, अध्यात्मिक, परंपरागत ज्ञान, अनुभव आणि शिक्षणाच्या आधारेच आल्या आहेत.

 

हिंदू धर्माशी निगडीत प्राचीन समजुती देखील विज्ञानात महत्वाच्या मानल्या जातात. हिंदू धर्मात लग्नानंतर केसांमध्ये कुंकू अथवा सिंदूर लावण्याची परंपरा आहे.शास्त्रानुसार सिंदूरमध्ये हळद, चुना आणि पारा यासारख्या गोष्टी असतात. या तिन्हींच्या मिश्रणाने शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मानसिक ताणही कमी होतो.

Leave a Comment