हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धन, सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक मानला जाते. असं म्हणतात धन संपत्तीची देवी माता लक्ष्मीची ज्या लोकांवर कृपा असते, त्या लोकांच्या आयुष्यात नेहमी आनंद असतो. त्यांना माता लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसन्न करते.
माता लक्ष्मीची कृपा प्रत्येकावर नसते. अंक ज्योतिषशास्त्रानुसार, काही अंक असे असतात ज्याचा थेट संबंध माता लक्ष्मीशी असतो. अंक शास्त्रानुसार, खास तारखांना जन्मलेले लोकांवर माता लक्ष्मीची कृपा दिसून येते.
जर तुमचा जन्म या खास तारखांना झाला असेल तर खूप नशीबवान आहात. कारण माता लक्ष्मीचा अशा लोकांवर नेहमी आशीर्वाद दिसून येतो. जाणून घेऊ या त्या तारखा कोणत्या आहेत?
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी माता लक्ष्मीची कृपा (Birth dates become so rich and get wealth and money by the grace of god)
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक ६ असतो त्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा दिसून येते. हा अंक माता लक्ष्मीचा अंक असतो. मूलांक ६ असलेले लोक अतिशय भाग्यवान असतात कारण माता लक्ष्मीची त्यांच्यावर विशेष कृपा दिसून येते आणि हा अंक माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय अंक आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने हे लोक आयुष्यात खूप यश कमवतात.
अंक ६ चा संबंध प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुख संपत्तीशी येतो ज्याचा कारक शुक्र ग्रह आहे. ज्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक ६ असतो. तसेच धन संपत्तीची देवी माता लक्ष्मीची त्याच्यावर विशेष कृपा दिसून येते. त्यांना आयुष्यात नेहमी मेहनतीचे फळ मिळते. माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. व्यवसायात हे लोक यशस्वी होतात आणि प्रचंड नफा कमवतात तसेच नोकरीच्या ठिकाणी हे लोक खूप प्रगती करतात.