फक्त एक महिना अन् त्यानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मंगळाच्या कृपेने मिळणार पैसा, नवी नोकरी अन् होईल पगारवाढ

ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. मंगळ भूमि, धाडस, रक्त, राग आणि पराक्रमाचा कारक आहे. इतर ग्रहांनुसार मंगळ सुद्धा नियमित गोचर करतात. त्यांचा गोचर दिड वर्षांमध्ये एकदा होतो. या वर्षी ते एप्रिलमध्ये कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे. त्यामुळे अनेक राशींचे नशीब पालटू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

 

धनु राशी

मंगळ गोचरमुळे धनु राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्याचे योग दिसून येत आहे. तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहे. त्यांना मंगळच्या कृपेने पुढील महिन्यापर्यंत नोकरी मिळू शकते. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मंगळ गोचर अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. अनेकांना मोठ्या डिल मिळू शकतात ज्यामुळे चांगला नफा वाढू शकतो. धनु राशीच्या लोकांना चांगला आर्थिक फायदा होईल. सर्व कामे त्यांच्या मनाप्रमाणे होतील.

 

कन्या राशी

ग्रहाचे सेनापती मंगळ गोचरमुळे कन्या राशीच्या लोकांची आर्थिक वृद्धी होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ मिळू शकतो. पैसा कमावण्याचे अनेक नवीन स्त्रोत मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. मुलांच्या अभ्यासामुळे हे लोक समाधानी राहीन.आई वडिलांचा आशीर्वाद मिळेल.घरात मांगलिक कार्य होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. अडचणींंवर मात करू शकतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेन.

 

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

मंगळ देव या राशीच्या लोकांसाठी कुंडली भाग्य आणि विदेश स्थानावर गोचर करणार आहे. अशात वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. विदेशात जाण्याचे या लोकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. हे लोक नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकतात किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करू शकतात. जुने मित्र किंवा ओळखीतील लोक अचानक भेटतील. कुटुंबाबरोबर बाहेर फिरायला जाऊ शकता.

Leave a Comment