धनप्राप्ती होण्याआधी मिळतात ‘हे’ 5 विशेष संकेत; लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने सुरू होतात चांगले दिवस

वास्तुशास्त्रानुसार असे काही संकेत आहेत ज्यांचा जीवनातील सकारात्मक उर्जेशी संबंध असल्याचे दिसून येते. हे चिन्ह सूचित करतात की तुम्हाला आयुष्यात आर्थिक लाभ होणार आहे. ही चिन्हे तुमच्या सुख-समृद्धीचेही प्रतीक आहेत. जसे की गाय भाकरी खाताना पाहणे देखील शुभ मानले जाते. विशेषत: गायीला पहाटे भाकरी खाताना पाहणे हे आयुष्यातील दुःखद किंवा वेदनादायक दिवसांच्या समाप्तीचे लक्षण मानले जाते. याशिवाय इतर काही विशेष चिन्हे आहेत ज्यांचा संबंध धनप्राप्तीशी आहे. चला तर जाणून घेऊया लक्ष्मी प्राप्तीची खास लक्षणे कोणती आहेत.

भुवया फडफडणे

ज्योतिष शास्त्रात असे काही संकेत आहेत ज्याचा संबंध संपत्तीच्या प्राप्तीशी देखील जोडला जातो. विशेषत: जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी उठल्याबरोबर तुमच्या भुवया फडफडत असल्याचे जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होणार आहे.

स्वप्नात कमळाचे फूल पाहणे

स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो, त्यामुळे स्वप्नात कमळाचे फूल दिसणे देखील शुभ लक्षण मानले जाते. लक्ष्मी देवी कमळाच्या फुलात विराजमान असते. तसेच लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी कमळाचे फूल अर्पण केले जाते, त्यामुळे जर तुम्हाला स्वप्नात कमळाचे फूल दिसले तर समजून घ्या की तुम्हाला भविष्यात धनाची प्राप्ती होणार आहे.

 

घरात पोपट पक्षी येणे

पोपटाचा संबंध संपत्तीचा देव कुबेर यांच्याशी आहे. तसेच वास्तुशास्त्रानुसार पोपट देखील लक्ष्मी देवीशी संबंधित मानला जातो. अशा स्थितीत जर तुमच्या घरी पोपट आला तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजावे कारण पोपट हे सूचक आहे की तुमच्या घरातून आर्थिक समस्या दूर होणार आहेत आणि लक्ष्मी देवीची कृपेचा तुमच्यावर वर्षाव होणार आहे.

 

घरात घुबडाचे आगमन किंवा दर्शन होणे

घुबड हे लक्ष्मी देवीचे वाहन आहे, त्यामुळे असे मानले जाते की जर तुमच्या घरात घुबड आले किंवा तुम्हाला कुठेतरी घुबड बसलेले दिसले तर हे तुमच्यासाठी चांगले लक्षण आहे की तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट संपणार आहे आणि भविष्यात तुमचे उत्पन्न वाढणार आहे. कोणत्याही वेळी घुबड दिसणे हे धनप्राप्तीचे मोठे लक्षण मानले जाते.

 

शंखाचा आवाज ऐकणे

सकाळी उठल्याबरोबर कुठेतरी शंखाचा आवाज ऐकू आला तर समजावे की हा आवाज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे लक्षण आहे. शंख समुद्रातून निघाला आहे, म्हणून शंख हे अत्यंत पवित्र रत्न मानले जाते. लक्ष्मी माता देखील शंखाशी संबंधित मानली जाते कारण माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्रातून झाली होती.

Leave a Comment