का साजरी केली जाते नर्मदा जयंती? जाणून घ्या काय आहे कारण

भारतामध्ये सात धार्मिक नद्या आहेत ज्या अतिशय पवित्र आणि पूजनीय मानल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे नर्मदा नदी. हिंदू धर्मात माघ महिन्यातील शुक्लपक्षातील सप्तमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नर्मदा जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील सप्तमी तिथीला रथसप्तमी देखील साजरी केली जाते. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक नर्मदा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये श्रद्धेने स्थान करतात आणि नर्मदा मातेची पूजा करतात.

 

नर्मदा नदीत स्नान आणि ध्यान केल्याने पापांपासून मुक्तता होते आणि गंगा मातेचा आशीर्वाद ही प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. नर्मदा जयंती काय असते हे तुम्हाला माहिती असेलच पण नर्मदा जयंती का साजरी केली जाते हे तुम्हाला माहिती का? जर नसेल तर नर्मदा जयंती कोणत्या तारखेला आहे आणि का साजरी केली जाते ते जाणून घेऊ.

 

कधी आहे नर्मदा जयंती?

पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 4 फेब्रुवारी रोजी पहाटे 4: 37 मिनिटांनी सुरू होईल आणि 5 फेब्रुवारीला पहाटे 2:30 मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार नर्मदा जयंती 4 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे.

 

का साजरी केले जाते नर्मदा जयंती? धार्मिक शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या पौराणिक कथे नुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी नर्मदा मातेचा उगम झाला होता. त्यामुळे दरवर्षी नर्मदा जयंती या दिवशी साजर केली जाते. या दिवशी नर्मदा नदीत स्नान केले जाते.

 

नर्मदा जयंतीच्या दिवशी नर्मदा नदीत स्नान केल्याने माणसाची सर्व पापे धुतले जातात आणि शारीरिक तसेच मानसिक त्रासातूनही मुक्ती मिळते अशी धार्मिक आहे. नर्मदा नदीची पूजा केल्याने सुख समृद्धी येते आणि सौभाग्य वाढते असे देखील म्हणतात. नर्मदा जयंतीच्या मुहूर्तावर मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे नर्मदा नदीच्या काठावर भव्य जत्रेचे आयोजन केले जाते.

 

नर्मदा नदीमध्ये स्नान करण्याचे महत्त्व

 

नर्मदा जयंतीच्या दिवशी नर्मदा नदीत स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते.

 

नर्मदा नदीत स्नान केल्याने कालसर्प दोषही दूर होतो अशी धार्मिक मान्यता आहे.

 

नर्मदा जयंतीला नर्मदा नदीत चांदीच्या सापांचे विसर्जन करून कालसर्पदोष दूर केला जातो.

 

धार्मिक मान्यतेनुसार नर्मदा नदीतील प्रत्येक खडा नरवडेश्वर शिवलिंग म्हणून ओळखला जातो.

 

नर्मदा नदीचे उगमस्थान अमरकंटक येथे नर्मदा जयंती साजरी करण्यासाठी अत्यंत पवित्र मानले जाते.

 

नर्मदा जयंतीच्या दिवशी नर्मदा नदीत स्नान केल्यानंतर फुले, हळद, कुंकू अर्पण केले जाते.

Leave a Comment