दिवाळीच्या आधी गुरु होणार वक्री! ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, मान सन्मानासह मिळेल पैसाच पैसा

शनिदेवांप्रमाणेच गुरुही वेळोवेळी गोचर करो ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो नवरात्रीच्या दरम्यान गुरु ग्रह वक्री होणार आहे. ९ ऑक्टोबर सकाळी १०: ०१ वाजल्यापासून वृषभ राशीमध्ये गुरू वक्री होईल आणि पुढील वर्षी(२०२५) ५ फेब्रुवारीपर्यंत या स्थितीत वृषभ राशीत भ्रमण करत राहील. अशा स्थितीत गुरु ग्रहाची उलटी हालचाल सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. संपत्ती आणि मान-सन्मानातही वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

 

मिथुन राशी (Gemini )

गुरू वक्री झाल्याने मिथुन राशीच्या लोकांना फायदा मिळेल. कारण गुरू तुमच्या राशीपासून बाराव्या स्थानात वक्री होईल. तसेच तुमच्या संक्रमण कुंडलीतील सप्तम आणि कर्म स्थानामध्ये आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन आणि उत्तम प्रकल्प मिळतील आणि हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवणारा मानला जातो. नोकरीमध्ये कामाच्या चांगल्या संधी मिळतील आणि तुम्हाला अचानक प्रलंबित पैसे मिळू शकतात. तसेच या काळात व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात. तसेच, नवीन ऑर्डर मिळू शकतात. त्याच वेळी, यावेळी तुमचे तुमच्या वडि‍लांबरोबर नाते मजबूत असेल.

 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी गुरूची वक्री चाल अनुकूल ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीतील उत्पन्न स्थानात गुरु ग्रह वक्री होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्याच वेळी, तुम्हाला नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि तुम्हाला व्यवसायातही अनेक पटींनी नफा मिळेल. तसेच, या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच या काळात व्यापारी कोणतेही मोठे व्यावसायिक सौदे करू शकतात.

 

वृश्चिक (Scorpio)

गुरूची वक्री चाल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण गुरू हा ग्रह तुमच्या राशीतून सप्तम स्थानात वक्री होणार आहे. तसेच, गुरु हा धनाचा स्वामी आणि तुमच्या गोचर कुंडलीतील पाचवे घर आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यवसायात भरपूर नफा होईल आणि तुमची बौद्धिक क्षमता वाढून तुमची प्रगती होईल. नोकरदार लोकांना त्यांचे ऑफिसमधील काम आवडेल आणि तुमची लोकप्रियताही वाढेल.

Leave a Comment