पाच दिवसांनंतर शुक्र देणार बक्कळ पैसा; आश्लेषा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार प्रत्येक कामात यश

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा सकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा शुक्र मजबूत शुभ स्थितीत असतो तेव्हा आर्थिक चणचण भासत नाही.

त्याशिवाय अशा व्यक्तींना भौतिक सुखाची प्राप्ती होते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह २० जुलै रोजी पुष्य नक्षत्रातून आश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. कोणत्या आहेत या भाग्यवान राशी जाणून घेऊ…

 

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन करणार मालामाल

कन्या

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. भौतिक सुख प्राप्त होईल. वैवाहित जीवन सुखमय राहील. करिअरमध्ये हवी तशी प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. मानसिक तणाव दूर होईल.

धनू 

नक्षत्र परिवर्तनाने धनू राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशी परिवर्तनामुळे तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नवी नोकरी मिळेल व पगारवाढही होईल. आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. विद्यार्थ्यांसाठी काळाप्रमाणेच आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ

शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक सुख-सुविधा प्राप्त होतील. मान-सन्मान वाढेल, या काळात तुम्हाला भौतिक सुखेदेखील प्राप्त होतील. बचत करणे फायदेशीर ठरेल. लोक तुमच्या कामावर खूश असतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. या काळात खर्चांवर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. तुमचे मन प्रसन्न  मुलांकडून आनंदी वार्ता कळतील.

Leave a Comment