१३९ दिवस शनी उलट चालत ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार ३६० अंशात कलाटणी; प्रचंड श्रीमंती देणार शनैश्वर महाराज

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपले स्थान बदलत असतो. त्या ग्रहांच्या शक्तीनुरूप प्रभावित राशींच्या आयुष्यात बदल दिसून येऊ शकतात. ग्रहमालेतील शनी हा ग्रह सर्वात शक्तिशाली मानला जातो. जेव्हा शनीची चाल बदलते, शनी गोचर करून राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो किंवा शनीचा उदय किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा राशींवरील प्रभाव हा अत्यंत स्पष्ट दिसून येऊ शकतो.

येत्या दोन महिन्यात शनीच्या चालीत असाच महत्त्वाचा बदल दिसून येणार आहे. जून महिन्यात शनी आपले चाल ३६० अंशात बदलून उलट चालणार आहेत. ही स्थिती १३९ दिवस कायम असणार आहे. द्रिक पंचांगानुसार, जून पासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत शनी त्याच स्थितीत मार्गीक्रमण करणार आहेत. जून ते नोव्हेंबर दरम्यानचा हा कालावधी काही राशींसाठी इतका लाभदायक असणार आहे की यावेळी शनी महाराज संबंधित राशींना कोट्यधीश होण्याची संधी देऊ शकतात. या राशींमध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का हे पाहा..

 

जून ते नोव्हेंबर २०२४ मध्ये शनीदेव ‘या’ राशींना देणार अपार धन

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शनीची उलट चाल मेष राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत शुभ ठरू शकतो. तुम्हाला वाणी कौशल्यावर नवीन संपर्क जोडता येतील ज्याचा फायदा तुम्हाला आर्थिक मिळकत वाढण्यासाठी होऊ शकतो. नवीन नोकरीची संधी चालून येऊ शकते. या कालावधीत तुमचं बोलणंच तुमच्या कुंडलीतील योग ठरेल. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल, नातेवाईकांची सुद्धा मर्जी राखता येईल.

 

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीसाठी शनीची उलट चाल फायद्याची ठरू शकते. बुद्धी प्रयत्न आणि श्रम यातून या राशीला उत्तम यश प्राप्ती होईल. या लोकांना शनीचा संयम शोधकवृत्ती नी उ्दयोगबुद्धी नैसर्गिक प्राप्त होईल. त्यामुळे आर्थक बाजू उत्तम राहील. उद्योगधंद्यात नोकरीत स्थिरता लाभेल. मानसन्मानाचे योग येतील. कामाचे विशेष कौतुक होईल. पैसा गुंतवल्याने बऱ्यापैकी फायदा होईल. शेअर्स उद्योगातील गुंतवणूक खूप महत्त्वाची ठरेल.

 

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

शनी उलट चाल हे तुमच्या राशीसाठी बम्पर फायदा घेऊन येणार आहे. नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला मोठा प्रवास घडू शकतो तसेच काहींच्या भाग्यात बदलीचे सुद्धा संकेत आहेत. विवाहच्छुक व्यक्तींना उत्तम जोडीदाराचे स्थळ सांगून येईल. प्रेम संबंधांना घरातून मान्यता मिळू शकते. आपल्याला निवांत असा वेळ कदाचित मिळणार नाही पण तुम्हाला तुम्ही केलेल्या धडपडीतून अनपेक्षित व अचानक धनलाभ होऊ शकतो.

Leave a Comment