वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते, तर थेट गतीला ग्रहाची मार्गी गती म्हणतात.
यावेळी २०२४ मध्ये अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत. शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहेत. २९ जून २०२४ रोजी शनि वक्री होणार आहे. शनिदेवाची चाल बदलल्याने काही राशींवर वर्षभर शनिदेवाची कृपा राहण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींवर शनिदेवाची कृपा?
मेष राशी
शनीच्या वक्री चालीमुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात लाभाच्या भरपूर संधी मिळू शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी
या राशीच्या लोकांना मोठ्या प्रकरणात विजय मिळू शकतो. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमवू शकतात. या काळात वैवाहिक जीवन खूप आनंदी राहण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
तूळ राशी
शनीच्या वक्री स्थितीमुळे तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळही मिळण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. वैवाहिक जीवन आणि वाहनाचे सुख मिळण्याची शक्यता आहे.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना शनीच्या वक्री स्थितीमुळे मोठा लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांना काही चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगतीसोबतच आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला सरकारी मदतीचा लाभ मिळू शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)