एप्रिल महिना हा सणांचा- उत्सवाचा महिना असणार आहे. या उत्सवांची सुरुवात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणार आहे. १ ते ७ एप्रिल या कालावधीत ग्रहांचे बळ वाढणार आहे. या पहिल्या आठवड्यात मीन राशीत शुक्र, बुध व सूर्याच्या मिलनाने त्रिगही योग निर्माण होऊ शकतो. याशिवाय या आठवड्यात बुधादित्य योग व लक्ष्मी नारायण राजयोग सुद्धा निर्माण होणार आहे. या शुभ योगाचा प्रभाव १२ राशींवर होणार आहे. काही राशींचे नशीब चमकणार आहे, तर काहींना थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नेमकं मेष ते मीन राशीच्या नशिबात या आठवड्यात काय लिहून ठेवलंय, पाहूया.
१ ते ७ एप्रिल २०२४ चा आठवडा मेष ते मीन राशींसाठी कसा असणार?
मेष रास: मेष राशीसाठी लाभाची दारे उघडण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत काहीशी जोखीम पत्करावी लागेल. वैवाहिक जोडीदाराची साथ लाभेल.
वृषभ रास: आरोग्याची काळजी घ्या, पोटदुखीचा त्रास संभवतो, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. डोकं व मन शांत राहूद्या, निर्णय घेताना जोडीदाराला विश्वासात घ्यायला विसरू नका.
मिथुन रास: आर्थिक मिळकतीचे स्रोत बळावतील. प्रगतीच्या संधी तुम्हाला वाणीच्या बळावर प्राप्त कराव्या लागणार आहे. व्यावसायिकांसाठी हा कालावधी फायद्याचा असेल. आयुष्यात काहीसे चढ- उतार येऊ शकतात. भांडणांपासून दूर राहा, ताण वाढू शकतो.
कर्क रास: हा आठवडा आपल्यासाठी सर्वात शुभ आहे. पद, पैसे, प्रतिष्ठा आपल्या हाती येईल. सामाजिक कामातील रुची वाढेल. प्रेमसंबंध जपताना ओढाताण होऊ शकते.
सिंह रास: आरोग्याची हेळसांड करू नका. लहानशी समस्या सुद्धा वाढून मोठी होऊ शकते. आयुष्यात काही अडथळे येऊ शकतात. आठवड्याच्या सरतेशेवटी मात्र आनंदाची वार्ता कानी येऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना संधी मिळू शकते.
कन्या रास: या आठवड्यात नशीबच तुमचं दार ठोठावू शकतं. आपल्या कामाचं महत्त्व सर्वांच्याच लक्षात येईल, तुमच्या प्रभावाने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. खासगी आयुष्यात सुख शांती व प्रेम अनुभवता येईल.
तूळ रास: मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभाचे संकेत आहेत. दिखाव्यापासून दूर राहा. आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा. उच्च पदावरील वरिष्ठांशी संबंध जपून ठेवा.
वृश्चिक रास: एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याला कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. आपल्या कामाला वेग येईल. आरोग्यातही सुधारणा होऊ शकते. घरी व कुटुंबात शांतता राहिल.
धनु रास: वैयक्तिक संबंध सुधारतील. आपल्या जोडीदारासह वेळ घालवता येईल. जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील. आरोग्य व व्यवहार जपून करावा.
मकर रास: या आठवड्यात धैर्याने संकटाला सामोरे जा. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास तुम्हाला या आठवड्याच्या शेवटी प्रचंड मोठा धनलाभ होऊ शकतो. घाई गडबडीत काम करू नका. बाहेर खाणं टाळावं.
कुंभ रास: संतुलन साधून राहावे लागेल. धैर्याने तुम्ही गोष्टी हाताळल्यास विनाकारण होणारा मनस्ताप टाळता येऊ शकतो. वरिष्ठांशी विनाकारण भांडण करू नका. आर्थिक नुकसान होऊ शकते पण कुटुंबातील आनंद तुमची सगळी चिंता दूर करेल.
मीन रास: आपण बरीच वर्षे करत असलेली मेहनत तुम्हाला या आठवड्यात यशाच्या वाटेवर पुढे जाण्याची संधी देईल. प्रमोशन, पगारवाढ, होण्याचे योग आहेत. आपल्याला आयुष्यात प्रेमाची गोडी अनुभवता येऊ शकते, गोष्टी गृहीत धरू नका, नेटाने कृती करण्यावर भर द्या.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)