ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 14 March 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : महिलांसाठी उद्योगिनी योजना : Loan & Subsidy
मेष
आज तुमच्या आयुष्यात काही नवीन बदल होऊ शकतात. व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखू शकता.एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल.
6500 रुपयांवरुन आता थेट महिन्याला 15 हजार पगार मिळणार, शिंदे सरकारचं पोलीस पाटलांना मोठं गिफ्ट
वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय खास असेल. नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. व्यवसायात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विवाहितांसाठीही आजचा दिवस चांगला आहे. शिक्षणाशी संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, वैद्यकीय स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळू शकेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळाल्याने तुमचा बँक बॅलन्स मजबूत होईल. गरज पडल्यास भावंडांची मदत घ्याल.
मिथुन
आजचा दिवस छान जाईल. काही चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन नियोजनाबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक सुख-शांती राहील. कार्यालयातील कोणतीही गुंतागुंतीची बाब असेल तर ती सोडवता येईल. ऑफिसच्या कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळू शकते.
पेटीएम ताळ्यावर आली! आता फोन पे, गुगल पे युपीआय व्यवहारांवर चार्ज लावण्याच्या प्रयत्नात
कर्क
आज तुमच्या मनात कामानिमित्त नव्या कल्पना येऊ शकतात. जास्त कामामुळे तुमचा ताणही थोडा वाढू शकतो. संध्याकाळी मुलांसोबत वेळ घालवल्यावर बरं वाटलेय मालमत्तेसाठी तुम्हाला चांगली डील मिळू शकते. ऑफीसची कामं घाईत करणं टाळावं. तुमच्याकडून काही चुका होण्याची शक्यता आहे.
सिंह
आज दिवस सामान्य जाईल. आर्थिक बाबतीत हुशारीने वागणे इष्ठ ठरेल. जोडीदाराचा सल्ला घेणेही फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन प्रकल्प राबवून तुम्हाला फायदा होऊ शकतो. ऑफिसमधील सहकाऱ्याशी वाद घालणे टाळावे. पैशाशी संबंधित मोठे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
अभ्यासात सर्वात हुशार मानली जातात ‘या’ राशींची मुले! पालकांचे नाव करतात मोठे
कन्या
तुमचा आजचा दिवस उत्तम जाईल. कामाच्या बाबतीत परिस्थिती चांगली राहील. निरोगी रहाल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता, यामुळे तुमच्या नात्याची मजबूती कायम राहील. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. तुमच्या मेहनतीवर आई-वडील खूश होतील. तुम्हाला तुमच्या सर्व कामात त्यांचा पाठिंबाही मिळेल. चांगल्या निकालासाठी शिक्षकही तुमच्या पाठीशी उभे राहतील. तुमच्या मेहनतीमुळे व्यवसायाचा विस्तार होण्यात यश मिळेल.
तूळ
आज दिवस संमिश्र जाईल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. एखाद्याशी बोलताना विनम्रतेने बोलावे, यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित राहतील. या राशीच्या बिल्डर्सना नवीन प्रोजेक्टचा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सामान्य राहील. थकवा जाणवू शकतो. तुमची जीवनशैली बदलण्याची आणि तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वृश्चिक
आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल. स्वतःच्या मेहनतीने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता. काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. या राशीच्या मीडियाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाबद्दल तुमचा बॉस तुमची प्रशंसा करू शकतो. प्रियजनांसमोबत बाहेर जायचे प्लान ठरतील.
धनु
आज तुमचा दिवस चांगला जाईल. तुमचे मनोबल वाढल्याने महत्त्वाच्या कामात यश मिळेल. पालकांच्या सहकार्याने व्यवसायात प्रगती होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कामाच्या ठिकाणी तुमचे मन प्रसन्न राहील.
मकर
आज दिवस ठीक जाईल. वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर करणे टाळावे. काही अडचणी येऊ शकताच. काही सामाजिक बाबींमध्ये हातभार लावल्यास तुमच्याबद्दल आदर वाढू शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. अभ्यासात तुमची आवड वाढू शकते. नोकरीत उच्च अधिकारी तुमची प्रशंसा करतील, परंतु आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चढ-उताराचा असेल.
कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायातही तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमची अशी एखादी व्यक्ती भेटू शकते ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. तुमच्या सर्जनशीलतेने लोक प्रभावित होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नातेवाईक तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. वैवाहिक जीवनातील लोकांसाठी परिस्थिती अधिक अनुकूल असेल.
मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही आत्मविश्वासाने वागाल. काही रखडलेली कामं पूर्ण होतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी वाढीची संधी मिळू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांनी नियोजन करून तयारी केली तर करिअरच्या प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल. व्यवसायात नवीन करार होऊ शकतो.