होळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे जो फाल्गुन महिन्यात साजरा होतो. दोन दिवसांचा हा सण असतो. पहिल्या दिवशी होलिकाचे दहन होते तर दुसऱ्या दिवशी विविध रंगांनी होळी खेळली जाते. या दोन्ही दिवसांचे स्वतःचे महत्त्व आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी नेमक्या कोणत्या तारखेला आहे, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. 24 की 25 कोणत्या दिवशी होळी साजरी केली जाणार आहे जाणून घ्या.
पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 9.54 वाजता सुरू होणार आहे. जी दुसऱ्या दिवशी दुपारी 12.29 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 24 मार्च, रविवारी होलिका दहन करता येणार आहे. होलिका दहन करण्यासाठी शुभ मुहूर्त 11.13 पासून ते 12.27 पर्यंत आहे. म्हणजेच 1 तास 14 मिनिटे होलिका दहण करता येणार आहे.
होलिका दहन 24 मार्चला असणार आहे. त्यामुळे 25 मार्चला रंगानी धुलीवंदन खेळता येणार आहे. देशभरात रंगाने होळी साजरी होते. या दिवशी अनोळखी लोकही आपले बनतात आणि शत्रूही एकमेकांना मिठी मारून होळीच्या शुभेच्छा देतात.
होलिका दहन पूजा
होलिका दहन करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा चौकात लाकूड, काठ्या, झुडपे गोळा करून एक आठवडा अगोदर होलिका तयार केली जाते. हा लाकडाचा ढीग होलिका दहनाच्या दिवशी होलिका म्हणून जाळला जातो. होलिकाची पूजा करण्यासाठी होलिका आणि प्रल्हाद यांच्या मूर्तीही शेणापासून बनवल्या जातात. रोळी, फुले, कापूस, फुलांच्या माळा,हळद, मूग, गुलाल, नारळ, बताशा आणि 5 ते 7 प्रकारची धान्ये पूजा साहित्यात वापरली जातात. यानंतर होलिकेची प्रदक्षिणा केली जाते आणि होलिका दहन होते.