ज्योतिषशास्त्रानुसार, धन आणि समृद्धीचा दाता शुक्र मार्चमध्ये दोनदा गोचर करणार आहे. ज्यामध्ये ७ मार्चला शुक्र प्रथम कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्यावर शनिदेवाचे प्रभुत्व आहे, त्यानंतर ३१ मार्चला शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. मार्चमध्ये शुक्राचे दोन वेळा होणारे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे काही राशींचे नशीब या काळात चमकू शकते. संपत्तीतही वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
मेष राशी (Aries Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचा राशी बदल फायदेशीर ठरु शकतो. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच, नोकरी करणारे लोक त्यांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेऊ शकतील आणि त्यांच्या सुखसुविधांमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो. या काळात शेअर बाजार तुम्हाला चांगला नफा मिळण्याची देखील शक्यता आहे.
तूळ राशी (Tula Zodiac)
शुक्राचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. यामुळे तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. तुम्ही वाहने आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. त्याच वेळी, नोकरदार लोक आणि व्यावसायिकांना संक्रमण कालावधीत चांगला नफा मिळू शकेल आणि तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवनातील सर्व गैरसमज दूर होत नात्यात गोडवा येण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
मकर राशी (Makar Zodiac)
शुक्राचे संक्रमण मकर राशीसाठी देखील फलदायी ठरू शकते. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्हाला जमीन, वास्तू, वाहन इत्यादींचे सुख मिळेल आणि तुमच्या कामात नेहमी उत्साही राहू शकते. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थितीही सुधारु शकते.