मार्च सुरु होताच ‘या’ ४ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? चार मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?

ग्रह-तारे यांच्या दृष्टीने येणारा मार्च महिना खूप खास असणार आहे. या मार्च महिन्यात अनेक मोठे ग्रह आपले राशी बदलणार आहेत. यासोबतच अनेक ग्रह आपल्या चाल बदलतील. याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मार्च महिन्यात, सूर्य आणि शुक्रासह अनेक मोठ्या ग्रहांची राशी बदलणार आहे, ज्याची सुरुवात बुध ग्रहाने होईल.

 

बुध ग्रह ७ मार्चला मीन राशीत गोचर करेल आणि २६ मार्चला मेष राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १२ मार्चला शुक्र ग्रह कुंभ राशीत गोचर करणार आहेत. तर १४ मार्च रोजी, सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. १५ मार्च रोजी मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे शुक्र आणि शनि आधीच उपस्थित आहेत. अशा ग्रहांच्या स्थितीमध्ये, मार्च महिना हा काही राशींसाठी खूप खास मानला जातो. चला जाणून घेऊया मार्च महिन्यात ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो.

 

मार्चपासून ‘या’ राशींचे भाग्य चमकेल?

मेष राशी

चार ग्रहांचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

 

कर्क राशी

कर्क राशींच्या लोकांसाठी चार ग्रहांचे गोचर लाभदायी ठरु शकते. नवीन नोकरीचा शोध या काळात पूर्ण होऊ शकतो. मार्च महिन्यात एकीकडे तुमच्या व्यवसायाची खूप प्रगती होऊ शकते तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकेल. जमीन, वाहन इत्यादी खरेदीची शक्यता आहे.

 

कन्या राशी

मार्च महिना कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ सिध्द होऊ शकते. या महिन्यात तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. काही अनुभवी लोकांच्या सहकार्याने तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतूनही भरपूर फायदा होऊ शकतो.

 

मकर राशी

चार ग्रहांचे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. मार्च महिन्याची सुरुवात या राशीच्या लोकांसाठी चांगली राहू शकते. उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला सरकारी ऑर्डर देखील मिळू शकते.

Leave a Comment