१८ मार्चपर्यंत शनी महाराज ‘या’ राशींना देतील सोन्यासारखं आयुष्य; आजपासून नशिबाला कलाटणी देत होईल धन वर्षाव

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर, उदय, अस्त करत असतो. याचा प्रभाव प्रत्येक राशीवर शुभ- अशुभ स्वरूपात व कमी- अधिक प्रमाणात होत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीदेवाचे विशेष महत्त्व आहे. शनीच्या चालीत किंचितही बदल झाल्यास प्रभावित राशींच्या आयुष्यात काहीतरी उलथापालथ होते असं मानलं जातं. आज म्हणजेच ११ फेब्रुवारीला शनीदेव संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी कुंभ राशीत अस्त होणार आहेत.

१८ मार्च पर्यंत शनी महाराज याच स्थितीत विराजमान असणार आहेत. शनी अस्त झाल्यावर सूर्याचा प्रभाव वाढणार आहे परिणामी शनीची शक्ती कमी व सूर्याचा प्रभाव अधिक अशी अवस्था निर्माण होणार आहे. हा कालावधी काही राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरू शकतो. सूर्याच्या चैतन्याने या राशींच्या आयुष्यात नवी झळाळी येऊ शकते. या राशी कोणत्या व त्यांना काय लाभ होणार हे पाहूया..

 

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा अस्त हा तूळ राशीसाठी आनंदाने व सुखाने भरलेला काळ घेऊन येणार आहे. आजपासून १८ मार्चपर्यंत आपल्या अनेक मोठ्या इच्छा पूर्ण होतील तसेच कामे मार्गी लागतील. तूळ राशीच्या मंडळींना प्रॉपर्टी व वाहनाच्या खरेदीचा योग आहे.

या कालावधीत भौतिक सुख- सुविधा आपल्या वाट्याला येतील. वाडवडिलांच्या संम्पत्तीचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. समाजातील स्थान बळकट होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मदतीने आपण एखादे मोठे काम पूर्ण करू शकता ज्यातून प्रचंड मोठा धनलाभ संभवतो.

 

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मागील वर्षीच शनीच्या साडेसातीतून मुक्त झालेली मिथुन रास या वर्षी सुद्धा धनलाभाच्या व सन्मानाच्या संधी मिळणार आहे. खूप काळापासून अडकून पडलेली कामे पूर्ण होऊ शकतात ज्यातून तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्य सुधारेल. पती- पत्नीच्या नात्यात गोडवा वाढू शकतो. या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या मेहनतीला पर्याय शोधू नका. विवाह इच्छुक मंडळींना चांगले स्थळ सांगून येऊ शकते. आयुष्यात नव्या व्यक्तीची किंवा वस्तूची जोड लाभू शकते व याच माध्यमातून काही महत्त्वाचे बदल घडून येऊ शकतात.

 

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शनी अस्त झाल्याने मेष राशीच्या करिअरला खूप वेग मिळणार आहे. कित्येक वर्षांपासून आपण करत असलेल्या मेहनतीचे फळ हाती येऊ शकते. वरिष्ठांना आपले कष्ट दिसून येतील. आपल्याला नव्या नोकरीच्या संधी सुद्धा चालून येऊ शकतात. समाजात मान- सन्मान वाढीस लागू शकतो.

प्रतिष्ठा वाढल्याने आपल्याला नव्या जबाबदाऱ्या सुद्धा स्वीकाराव्या लागतील. व्यवसाय करत असल्यास त्यातून नवी लोकं आपल्याशी जोडली जातील व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. आई वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते.

Leave a Comment