फेब्रुवारीत ‘या’ तारखांना वाढदिवस असणाऱ्यांचे नशीब फळफळणार; मोठा धनलाभ होताना काय जपावं लागेल?

मूलांक- भाग्यांक या दोन्हीच्या आधारे तुमची शारीरिक क्षमता स्वभावातील गुणदोष विचार करण्याची पद्धती, नोकरी उद्योगधंद्यातील चढउतार, वैवाहिक जीवन या बाबतीत माहिती उपलब्ध होऊ शकते. तसेच पूर्ण जन्मतारखेतील कुठल्याही एका अंकाची उपस्थिती जास्त असेल तर अंकाचे चांगले वाईट परिणाम समजू शकतात. मुळात तुमचा मूलांक ओळखणे खूपच सोपे आहे.

तुमच्या जन्मतारखेतील अंकांची बेरीज म्हणजे तुमचा मूलांक. यानुसार फेब्रुवारी महिन्यात कोणत्या जन्मतारखेच्या व्यक्तींच्या भाग्याला कलाटणी मिळू शकते हे आज आपण पाहणार आहोत. तुमचा मूलांक ओळखून त्यानुसार येणारा फेब्रुवारी महिना आपल्याला कसा जाईल हे जाणून घेऊया..

 

फेब्रुवारी महिन्यात ‘या’ जन्मतारखा ठरणार नशीबवान?

मूलांक 1: कोणत्याही महिण्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्म झालेल्या लोकांचा मूलांक हा १ असतो. या मंडळींना फेब्रुवारी महिन्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घाईत घेतलेले निर्णय बाधक ठरू शकतात. या महिन्यात आपल्याला धैर्य राखावे लागू शकते. समाजातील मान- सन्मान वाढू शकतो वाणीवर नियंत्रण ठेवा.

 

मूलांक 2: कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्म झालेल्या मंडळींचा मूलांक हा २ असतो. या मंडळींना मागील कित्येक महिन्यांपासून केलेल्या कष्टांचे फळ मिळू शकते. कोणतीही मोठी समस्या निर्माण होणार नाही पण कोणताही मोठा लाभ सुद्धा होणार नाही, परिस्थिती बेताची असेल.

 

मूलांक 3: कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३० तारखेला जन्मलेल्या मंडळींचा मूलांक ३ असतो. या मंडळींना जुन्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो. आपल्याला फुंकून पाऊले उचलायला हवीत, इतरांच्या बोलण्यात अडकू नका. कठीण परिस्थितीशी जुळवून घेताना तुमच्या वाणीची मदत होऊ शकते.

 

मूलांक 4: ४, १३, २२, किंवा ३१ तारखेला जन्म झालेल्या मंडळींचा मूलांक ४ असतो. या मंडळींना फेब्रुवारी महिन्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाद विवादापासून दूर राहा. वाणीत माधुर्य आणण्याचा प्रयत्न करा, व्यापारी वर्गाला विशेष लाभ होऊ शकतो. इराणवरील अवलंबत्व कमी करा.

 

मूलांक 5: कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला जन्म झालेल्यांचा मूलांक ५ असतो. थोडं समजूतदारीने काम केल्यास हसत खेळत हा महिना आनंदाने जगता येईल. काम पूर्ण निष्ठेने करावे, विद्यार्थी वर्गाने अजिबातच अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते.

 

मूलांक 6: महिन्यातील ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या मंडळींचा मूलांक ६ असतो. आपल्याला समाधानकारक परिणाम मिळू शकतात. एखादी आयुष्य बदलवून टाकणारी घटना घडू शकते. आपल्याला मेहनतीचे शुभ फळ मिळू शकते. स्वतःवर अधिक विश्वास ठेवा इतरांच्या बोलण्यात गुंतू नका. गुंतवणुकीतून प्रचंड मोठा लाभ होऊ शकतो पण पूर्ण खबरदारी बाळगा.

 

मूलांक 7: कोणत्याही महिन्याच्या ७, १६, २५ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक हा ७ असतो. फेब्रुवारी महिन्यात ७ मूलांक असणाऱ्या व्यक्तींना सावधगिरीने काम करावे लागेल, अजिबात घाई करू नका पण आपल्याकडून आळशीपणा होणार नाही याचीही खात्री करा. तर्कशुद्ध निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्या जवळच्या मंडळींचा विश्वास पुन्हा जिंकावा लागू शकतो.

 

मूलांक 8: ८, १७, २६ या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ८ असतो, या महिन्यात तुम्ही खूप उर्जावान राहाल. पण ऊर्जेचा वापर योग्य ठिकाणी करावा अन्यथा अतिउत्साह घातक ठरू शकतो. कामाच्या बाबत वेळ पाळावी लागेल, नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात पण त्यांच्याकडे एक संधी म्हणून पाहावे जेणेकरून येत्या काळात आपल्या प्रचंड धनलाभ व यश प्राप्त होऊ शकते.

मूलांक 9: कोणत्या महिन्याच्या ९, १८ व २७ तारखेला जन्म झालेल्या मंडळींचा मूलांक ९ असतो. आपल्याला मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात. सरकारी नोकरीची संधी चालून येऊ शकते. या कालावधीत रखडलेले काम पूर्ण होऊन अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. लहान- सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका.

Leave a Comment