ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत जवळपास अडीच दिवसांपर्यंत राहतो. त्यामुळे चंद्राची दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती होते. अशातच आता १० डिसेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. जिथे मंगळ आणि सूर्य आधीच उपस्थित आहेत. त्यामुळे वृश्चिक राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. हा योग अनेक राशींसाठी खास ठरु शकतो. या योगाचा कोणत्या राशींना विशेष फायदा होणार आहे ते जाणून घेऊया.
मिथुन रास
मिथुन राशीच्या तिसऱ्या स्थानी त्रिग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. विशेषत: विद्यार्थ्यांना अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करु शकतात. तसेच तुम्हाला कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकते. प्रशासकीय किंवा सरकारी नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. शत्रूंवर विजय मिळू शकतो. या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकते.
कन्या रास
कन्या राशीमध्ये मंगळ, सूर्य आणि चंद्र यांची तिसऱ्या स्थानी युती होत आहे. त्यामुळे या योगाचा सकारात्मक प्रभाव कन्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पाहायला मिळू शकतो. व्यावसायिक जीवनात यश मिळाल्याने पगारही वाढू शकतो. आयातीशी संबंधित व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. या काळात विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो. कामानिमित्त प्रवासही घडू शकतो.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लग्न स्थानी त्रिग्रह योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. तुम्हाला कायदेशीर बाबींमध्ये सहज यश मिळवून देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आदराचे स्थान मिळेल. करिअरच्या नवीन संधीही उपलब्ध होऊ शकतात. या काळात जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.