ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळी राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतो. ज्याचा प्रभाव १२ राशींवर शुभ- अशुभ प्रकारात होत असतो. तुमच्या राशीचे स्वामी व ग्रहाची कुंडलीतील स्थिती यानुसार तुमच्या रोजच्या आयुष्यात नेमका किती प्रमाणात प्रभाव दिसून येऊ शकतो हे ठरत असते. २०२३ च्या शेवटाकडे शनीने राहूच्या नक्षत्रात प्रवेश करून अशी काही युती केली आहे की २०२४ च नव्हे तर २०२५ पर्यंत तीन राशींच्या आयुष्यात प्रचंड प्रगती व धनलाभाचे योग दिसून येत आहेत. २०२४ व २०२५ या दोन वर्षात या तीन राशी प्रचंड पैसे कमावून कोट्याधीश होऊ शकतात. २०२४ च्या सुरुवातीलाच शनी व राहूच्या या युतीला गुरुचे पाठबळ मिळणार असल्याने तुम्हाला आयुष्यात अनपेक्षित वेग जाणवू शकतो. नेल्या कोणत्या राशीवर हे ग्रह मेहेरबान असणार आहेत हे जाणून घेऊया..
दोन वर्ष शनी- राहू बनतील ‘या’ राशींचे धनगुरू
मेष रास
मेष राशीच्या मंडळींना तिन्ही ग्रहांची शुभ स्थिती अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. २०२४ मध्ये गुरु मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत मात्र सरतेशेवटी प्रभाव इतका तीव्र असेल मेष राशीच्या मंडळींना प्रत्येक पावलावर धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने तुमच्या मनावरील ताण हलका होण्यासाठी मदत होऊ शकते. जुन्या शिक्षकांशी गाठभेट होईल ज्यामुळे तुमच्या आयुष्याला नव्याने कलाटणी घेणारी एखादी स्थिती उद्भवू शकते. तुमचे निर्णय घेताना हितशत्रूंशी चर्चा टाळावी. आपल्या योजना विनाकारण इतरांना सांगणे टाळावे यामुळे अडथळेच निर्माण होऊ शकतात.
वृषभ रास
२०२५ पर्यंत वृषभ राशीवर गुरुकृपा असणार आहे. शनीदेव करिअरमध्ये प्रगतीसाठी संधी देऊ शकतात. स्वतःच्या मनावर विश्वास ठेवावी लागेल. जबाबदाऱ्या झटकू नका.तुमच्या आत्मविश्वासावर काम करा, वाणीमध्ये सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बोलण्याने अनेक प्रश्न सुटू शकतात. अनोळखी क्षेत्रात काम करण्याची ओढ लागू शकते. अध्यात्माची तुम्हाला रुची वाटेल. तुमच्या नशिबात वैवाहिक सुखाचे संकेत आहेत. अविवाहित मंडळींना किंवा लग्नासाठी उत्सुक व्यक्तींना स्थळ चालून येऊ शकते. नव्याने आयुष्यात जोडल्या गेलेल्या व्यक्तीमुळे धनलाभाचे योग आहेत.
सिंह रास
सिंह राशीसाठी २०२४ ते २०२५ हा कालावधी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. व्यवसायात वृद्धीची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी आजवर तुम्ही ज्या समस्यांना तोंड देत होतात त्या तुमच्या वाटेतून बाजूला होऊ शकतात. तुम्ही आर्थिक मिळकत कामाव्यक्तिरिक्त इतर स्त्रोतांमधून वाढू शकते. शेअर बाजारात तुमची नशीब जोरदार सिद्ध होऊ शकते. परदेश यात्रेचे योग आहेत. तुम्हाला आई वडिलांच्या सल्ल्याचा खूप फायदा होऊ शकतो. चिडचिड टाळावी. समजूतदारपणा तुम्हाला प्रचंड यश व धनप्राप्ती करून देऊ शकतो.