ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतात, ज्यामुळे अनेक ग्रहांची युती होते, तर काही शुभ किंवा अशुभ राजयोग तयार होतात. अशातच आता भूमीचा पुत्र आणि ग्रहांचा सेनापती मंगळाने १६ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला होता, जिथे तो २७ डिसेंबर २०२३ पर्यंत राहणार आहे. मंगळ वृश्चिक राशीत गेल्याने रुचक नावाचा राजयोग तयार होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगाचा १२ राशीच्या लोकांच्या आयुष्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम दिसून येतो. परंतु या सर्व राशींपैकी तीन राशी अशा आहेत ज्यांना या योगाचा प्रचंड लाभ होऊ शकतो. त्यांच्या जीवनावर रुचक योगाचा अधिक सकारात्मक प्रभाव पडू शकतो. या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तर रुचक राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया.
वृश्चिक रास
मंगळाने स्वतःची राशी वृश्चिकच्या लग्न स्थानी प्रवेश केला आहे. त्यामुळे रुचक योगाचा या राशीच्या लोकांच्या जीवनावर खूप चांगला प्रभाव पडू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोकही यश मिळवू शकतात. या काळात तुम्ही समजुतीने आणि धैर्याने कायदेशीर बाबी सहज सोडवण्याचा प्रयत्न करु शकता. तुम्हाला जोडीदाराकडूनही पूर्ण सहकार्य मिळू शकेल. मालमत्ता आणि आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
कर्क रास
मंगळ स्वतःच्या राशीच्या पाचव्या स्थानी गोचर करत असल्यामुळे रुचक राजयोग या राशीच्या लोकांना अपार यश मिळवून देऊ शकतो. तुमची उच्च शिक्षणाची इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. नोकरदारांचे काम पाहून उच्च अधिकारी तुमचे प्रमोशन करु शकतात. तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायातही प्रचंड यश आणि नफा मिळू शकतो.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी रुचक योग फायदेशीर ठरू शकतो. मंगळ या राशीच्या दुसऱ्या स्थानी आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. बँक बॅलन्स वाढून तुम्ही बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. धार्मिक प्रवासाला जाण्याचा योग येऊ शकतो. या काळात तुम्हाला थोडे सावध राहणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवू शकता.